आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामावरून घरी आल्यावर त्याने खूप वेळ दार ठोठावले, खिडकीतून आत डोकावताच सरकली पायाखालची जमीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगांव (हरियाणा)- मानेसरमध्ये एका घरात पोलिसांना दोन मृतदेह आढळून आले. धक्कादायक म्हणजे या घरात पोलिसांनू 2 गावठी कट्टे सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तींचे नाव सुभाष आणि विकास आहेत. पोलिसांना संशय आहे की दोघांनी एकमेकांना गोळी मारली असावी. 

 

तिसरा मित्र रूममध्ये आल्यावर कळाला प्रकार 
- त्यांच्यासोबतच त्यांचा तिसरा मित्र विक्रांत राहत होता. तो सकाळी 8 वाजता कामावरून परतला होता. खूप वेळ त्याने दार ठोठावले, पण कोणीच दार उघडले नाही. त्यानंतर त्याने खिडकीतून आत डोकावले असता त्याला सगळा प्रकार कळला. त्याने घटनेची माहिती घरमालकाला दिली आणि त्यांनी पोलिसांना बोलवले.

 

पोलिसांना खोलीत दारूच्या बाटल्या 2 गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे मिळाले. दोघांचा गुन्हे जगताशी संबंध असल्याचा दावा पोलिस करत आहेत. त्या दोघांपैकी विकासवर आधीच खूनाचा गुन्हा दाखल आहे. 

बातम्या आणखी आहेत...