Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Friendship Day Celebration of youth

Friendship Day Celebration: सामाजिक बांधिलकीसह तरुण करताहेत मैत्रदिनाचे उत्साही नियोजन

प्रतिनिधी | Update - Aug 05, 2018, 12:51 PM IST

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार, हा मैत्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

 • Friendship Day Celebration of youth

  सोलापूर - ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार, हा मैत्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येकाच्या बगिचात मैत्रीची झाडे डोलत असतात. अंंगणभर पसरलेली झाडे सुखात साथ देतातच, दु:खात कवेत घेतात. संकटात सावरतात तर निराशेच्या गर्तेतून ती बाहेरही काढतात. मैत्रीची ही सावली प्रत्येकांच्या मनात असते. नातेवाईक, रक्ताच्या नात्यांपेक्षाही कधी कधी मैत्रीचे नाते घट्ट असते. वेळप्रसंगी या नात्याच्या विश्वासावरच वाट्टेल त्या प्रसंगाला तोंड देण्याचे धैर्ययही येते. अशा मैत्रीच्या नात्यांची जपणूक असणा ऱ्यांकडून आवर्जुन मैत्र दिन साजरा केला जातो.

  फ्रेंडशिप बँड बांधून एकमेकांची मैत्रीचे ऋण व्यक्त केले जाते. आपली मैत्री अशीच अबाधित ठेवण्याबरोबरच ती अतूट राहील असा विश्वासही यानिमित्त व्यक्त केला जातो. यानिमित्त फ्रेंडशिप बँडचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. दोन रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंतचे बँड असतात. अर्थात मैत्री व्यक्त करण्यासाठी केवळ बँड बांधून ती व्यक्त करणे इतकाच पर्याय नाही. शुभेच्छा संदेश देत, सोशल मीडियावर छायाचित्रे अपलोड करीत आपल्या मैत्रीची ग्वाही मैत्रदिनी आवर्जुन दिली जाते.

  सोशल मीडियाच्या विविध पोस्ट पाहिल्या तर सर्वांधिक ट्रंेड मैत्रीवरचा राहील. रविवारचा दिवस सुटीचा असल्याने वीकएण्ड मिनी सहल, पावसाळी वातावरण, हॉटेल पार्टी यांचेही बेत त्या त्या ग्रुपकडून आखले गेले आहेत.

  सामाजिक जाणीवही
  कोणताही डे असो, खाऊ - पिऊ - मजा करू अशा पद्धतीने ते साजरा करताना तरुणाई पुढे असते. मात्र दुसरीकडे सामाजिक भानही जपले जात असल्याची उदाहरणे समोर येतात. मैत्रदिनाला सामाजिक बांधिलकची किनारही असते. कोणी वृक्षाला निसर्गाला फ्रेंडशिप बँड बांधून आपल्या जाणिवा व्यक्त करतात. कोणी पर्यावरण रक्षणासाठी मैत्री दिन साजरा करतात.

Trending