आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Friendship Day Special : बिलडेस्क : ३ मित्रांनी सोबत सोडली नोकरी, आजही एकाच केबिनमध्ये एकत्र बसतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९९९ मध्ये कार्तिक गणपती, एम. एन. श्रीनिवासू आणि अजय कौशल यांनी बिलडेस्क सुरू केली. ही ऑनलाइन पेमेंट गेटवे कंपनी आहे. देशाचे ७०% ऑनलाइन बिलिंग ट्रान्झॅक्शन तिच्याद्वारेच होते. वार्षिक सुमारे ४.५ लाख कोटी रुपयांचे. संस्थापक सदस्य अजय सांगताहेत मैत्रीने या तिघांना ‘युनिकाॅर्न’ बनवले...   आम्हा तिघांची भेट मुंबईत आॅर्थर अँडरसन या अमेरिकी अकाउंट फर्ममध्ये झाली. हळूहळू मैत्री झाली. दरम्यान, एक ग्राहक म्हणाला-कन्सल्टिंग वगैरे बंद करा. स्वत:चे काही करा. मग आम्ही त्या विचारावर चर्चा केली. ३१ डिसेंबर १९९८ ला आम्ही अँडरसन सोडली. अशा प्रकारे नववर्षात आम्ही तिघे बेरोजगार झालो. आम्ही इलेक्ट्राॅनिक पेमेंटवर काम सुरू केले. बँक आॅफ वडोदरा आमची पहिली ग्राहक ठरली. कंपनी चालवण्यासाठी सर्वांनी आपापल्या क्षेत्राचे काम हाती घेतले. कार्तिकने टेक्नाॅलाॅजी, वासूने अकाउंटिंग आणि मी मार्केट पाहू लागलो. काम वाटले गेले तरी आम्ही नेहमी एकत्र राहिलो. आजही आम्ही तिघे एका कार्यालयात एकाच कक्षात बसतो. विशेष म्हणजे जेवढा वेळ आम्ही एकत्र घालवला तेवढे कुटुंबासोबतही राहिलो नाही. जेव्हा आम्ही बिलडेस्क सुरू केली होती तेव्हा इंटरनेट अगदी नवे होते. आम्ही एक-दोन वर्षाचे टार्गेट घेऊन चालतो. नवे सेक्टर कव्हर करत आहोत. आज प्रत्येक सेक्टरमध्ये अव्वल १० पैकी ६ कंपन्या आमच्यासोबत काम करत आहेत. मैत्रीमुळे गोष्टी सोप्या होतात. आव्हानेही येतात, पण त्यांना असे तोंड देतो की काही कळतही नाही.