आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Friendship Day Special: FreshDesk: Five Friends Could Not Gave 15 Rupees Then We Cant Set Billion Dollar Company

Friendship Day Special : फ्रेशडेस्क : पाच मित्रांनी १५ हजार दिले नसते तर बिलियन डाॅलरची कंपनीच झाली नसती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१० मध्ये गिरीश मथरुभूतम आणि शान कृष्णासामी या दोन मित्रांनी फ्रेशडेस्क सुरू केली. एका लहानशा घरापासून सुरू झालेल्या या कंपनीने ९ वर्षांत युनिकाॅर्न स्टेटस मिळवले. कर्मचाऱ्यांची संख्या ६ वरून ३१३७ झाली. मैत्रीमुळे कंपनी कशी शून्यापासून शिखरापर्यंत गेली हे सांगत आहेत तामिळनाडूतील गिरीश...   मी आज जे काही आहे ते मित्रांमुळेच. मित्रांनीच मला काॅम्प्युटर शिकवले, त्यानंतर मी ‘एक्स्पर्ट लॅब’ ही माझी पहिली कंपनी उघडू शकलो. त्यासाठी ५ मित्रांनी १५ हजार रुपये दिले होते. त्यातून मी टेबल आणि काॅम्प्युटर खरेदी केले. पहिल्याच महिन्यात एक लाखाची कमाई झाली. काही दिवसांनी हे काम कंटाळवाणे झाल्याने नंतर जोहो या अमेरिकी कंपनीशी जोडला गेलो. तेथे शान कृष्णासामीशी मैत्री झाली. सोबत १० वर्षे काम केले. एक दिवस मी एक लेख वाचला, त्यात एका ग्राहकाने फीस दिल्यानंतरही चांगली सर्व्हिस न मिळाल्याची तक्रार केली होती. या समस्येमुळे मला फ्रेशडेस्क या आयटी सोल्युशन कंपनीची आयडिया आली. मी हे शानला सांगितले आणि विचारले-सोबत काम करायचे? त्याने एका क्षणात नोकरी सोडली. तेव्हा शानने नकार दिला असता तर फ्रेशडेस्क स्थापनच झाली नसती. २०१० मध्ये आम्ही दोघांनी ६० लाख रुपयांद्वारे फ्रेशडेस्क सुरू केली. लाँचच्या दुसऱ्याच दिवशी पहिले ग्राहक मिळाले आणि प्रवास सुरू झाला. आज आमचा निर्णय योग्य ठरला आहे. आज आम्ही ६० देशांत सर्व्हिस देत आहोत ही मैत्रीचीच ताकद आहे.

बातम्या आणखी आहेत...