आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Friendship Day Special : These Are Some Friends Of Bollywood Who Best Friends Of Each Other Even After Their Clashes

Friendship Day Special : बॉलिवूडचे हे काही मित्र, ज्यांची मैत्री अनेक रुसव्या फुगव्यानंतर आजही आहे अबाधित 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र महत्वाचे असतात. मित्रांसोबत मस्ती, थट्टा आणि छोटी मोठी भांडणे होतात. मित्रच एक अशी व्यक्ती असते जी तुमची परेशानीदेखील समजून घेतो. आपल्या सर्वांप्रमाणे बॉलिवूड सेलेब्सहीदेखील काही खास मित्र आहेत. त्यांची मैत्री अनेक वर्षांपासून आहे. प्रत्तेकाप्रमाणे हे सेलेब्स आपल्या मित्रांसोबत भांडतात पण आणि पुन्हा एकत्रही होतात. चला जाणून घेऊयात बॉलिवूडच्या काही बेस्ट फ्रेंड्सबद्दल...
 

करण जोहर आणि काजोल... 
सुरुवातीला करण जोहर आणि काजोलबद्दल बोलूयात. यांची मैत्री आणि भांडण मुकापासूनच लपलेले नाही. पण हे दोघे आजही पक्के मित्र आहेत आणि भांडणे विसरून पुन्हा एकमेकांसोबत उभे राहतात. काजोल-करणची मैत्री चित्रपट 'कभी खुशी कभी गम' सोबत सुरु झाली होती. दोघांची मैत्री एवढी गटात होती की, प्रत्येक छोट्या मोठ्या आनंदात दोघे एकत्र दिसायचे. करणच्या अनेक चित्रपटांमध्ये काजोलच लीड असायची आणि नाहीतर ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे चित्रपटात असायची. पण एक वेळ अशी आली होती जेव्हा दोघांमध्ये अंतर आले होते. याचे कारण होते करणचा चित्रपट 'ऐ दिल है मुश्किल' आणि काजोलचा पती अजयचा चित्रपट 'शिवाय' चे एकाच दिवशी रिलीज होणे. दोघे आपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलायला तयार नव्हते तर काजोलने पतीची साथ देत करणसोबत बोलणे बंद केले होते. दोघांचा चित्रपट एकदाच रिलीज झाला आणि अजयच्या चित्रपटाचे खूप नुकसान झाले. यानंतर दोघांच्या नात्यात अजूनच अंतर आले. गोष्ट एवढी वाढली की, करणने आपल्या बायोग्राफीमध्ये काजोलच्या नावाचा उल्लेखही केला नाही. म्हणतात वेळ सगळ्या जखमा भरते. तसेच नंतर दोघांना आपल्या मैत्रीची आठवण आली आणि करणने काजोलचे नाव आल्या पुस्तकात सामील न केल्यामुळे नॅशनल टेलिव्हिजनवर तिची माफी मागितली. आज आता ते पुन्हा चांगले मित्र झाले आहेत.  
 

अजय देवगन आणि रोहित शेट्टी
काजोलप्रमाणेच अजय देवगनदेखील मैत्री निभावण्यात कुणापेक्षा कमी नाही. अजय देवगन आणि रोहित शेट्टी बालपणापासूनचे मित्र आहेत. हेच कारण आहे की, रोहितच्या जास्तीत जास्त चित्रपटांत अजय लीड रोलमध्ये दिसतो. पण काही काळापूर्वी रोहितने शाहरुख खानला ‘दिलवाले’ मध्ये कास्ट केले. या गोष्टीवरून अजय आणि रोहित यांच्या मैत्रीत अंतर आले होते. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर रोहितने हे स्पष्ट केले की, तो आज जे काही आहे ते अजयमुळे आहे. रोहित म्हणाला होता, 'अजयने तेव्हा माझी साथ दिली होती जेव्हा माझे चित्रपट चालत नव्हते. अजयने माझ्यावर विश्वास दाखवला होता आणि माझ्या फ्लॉप चित्रपटांनंतरही माझ्यासोबत काम केले.' रोहितच्या या वक्तव्यानंतर अजयनेनेदेखील जुन्या गोष्टी विसरून रोहित आणि आपल्या अतूट मैत्रीचा स्वीकार केला होता.  
 

फराह खान आणि शाहरुख खान
फराह खान आणि शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात पक्क्या मित्रांपैकी एक आहेत. दोघे एकमेकांच्या चित्रपटाचा भाग असतात. पण काही वर्षांपूर्वी या दोघांच्या मैत्रीत अंतर आले होते. झाले असे की, फराह खानचा पती शिरीष कुंदर शाहरुखला आपल्या एका चित्रपटात कास्ट करू इच्छित होता पण शाहरुखने त्याचा चित्रपट करण्यास नकार दिला. अशात फराहने आपल्या पतीची साथ दिली आणि शाहरुखपासून अंतर ठेऊन राहू लागली. सुमारे 5 वर्षे दोघांमध्ये कोल्ड वॉर चालले. पण आता दोघांचे नाते पुन्हा सामान्य झाले आहेत. फराह लवकरच 'सत्ते पे सत्ता' चा रीमेक बनवणार आहे आणि शाहरुख त्यात एका विशेष रोलमध्ये दिसणार आहे. 
 

सलमान खान आणि संजय दत्त
सलमान आणि संजय दत्त बेस्ट फ्रेंड्स आहेत. काही वर्षांपूर्वी जेव्हा 'बिग बॉस' संजय दत्त होस्ट करत होता तेव्हा अचानकच मेकर्सने संजयला रिप्लेस करून सलमानला होस्ट बनवले होते. तेव्हा खूप बातम्या आल्या की, मेकर्सच्या या निर्णयाचा परिणाम स्टार्सच्या नात्यावर पडला आहे आणि दोघांनी एकमेकांशी बोलणे बंद केले आहे. पण दोघांमध्ये काहीच परेशानी नव्हती. जेव्हा संजय दत्त जेलमध्ये होता सलमान त्याला भेटण्यासाठीही गेला होता. तसेच संजय अनेकदा म्हणाला आहे की, सलमान त्याचा चांगला मित्र आहे आणि नेहमी राहील.
 

बातम्या आणखी आहेत...