आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Friendship Day : This TV Artists Has Special Space In Their Life For Their Friends, Lets Know About Their Friendships

Friendship Day : या टीव्ही कलावंतांसाठी त्यांचे मित्र आणि मैत्री यांचे स्थान आहे सर्वात महत्वाचे, जाणून घेऊयात त्यांच्या मैत्रीविषयी  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे..बॉलीवुडमधील हे प्रसिद्ध गाणे आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला आपल्या मित्रांची आठवण होते. आज फ्रेंडशिप डे आहे. त्यामुळे आपण सर्वच हा दिवस साजरा करण्यासाठी उत्सुक असतो. यानिमित्त आम्ही टीव्ही इंडस्ट्रीतील काही कलाकारांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून त्यांच्या बेस्ट फ्रेंडची माहिती जाणून घेतली... 
 

जय भानुशाली 
आयुष्यााच्या कोणत्याही वळणावर जे आपल्यासोबत उभे राहतात. तेच खरे मित्र असतात. मी स्वत:ला नशीबवान समजतो, माझ्याकडे एक नव्हे तर असे तीन मित्र आहेत. नदीम, मुन्ना आणि भोपीं. हे लोक माझे सर्वात चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी नेहमी भेटत असतो. आमचे विचारही मिळतात, ते माझे खूप जुने मित्र आहेत. माझ्या आयुष्यात अनेक चढ उतार आले त्यावेळी या लोकांनी मला साथ दिली. ते खंबीरपणे माझ्यासोबत उभे राहिले. 
 

शांतनू माहेश्वरी 
माझ्या पहिल्या मालिकेची प्रोजेक्ट हेड पल्की मल्होत्रा माझी सर्वात चांगली मैत्रिण आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या बऱ्याच चढ उताराची ती साक्षीदार आहे. मला तिने मार्गदर्शन केले. आज आयुष्यात ती नसती तर मीदेखील नसताे. तिच्यामुळे मला माझ्या उणीवा कळल्या. त्या गोष्टीवर लक्ष देत मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलोे. तिच्यामुळे मला कामाची ऊर्जा मिळाली. तिच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या व्यक्तीमत्त्वाला आकार देऊ शकलाे. आज मी जे काही आहे तिच्यामुळेच आहे. 
 

सृष्टी रोडे 
शालेय जीवनापासूनच जुही ही माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे. ती नेहमीच एक उत्तम साथ देणारी जीवलग मैत्रीण असून आजवर तिने मला माझ्या सर्व चांगल्या गोष्टींमध्ये सहकार्य केले आहे. ती माझ्या जीवनाचा नेहमीच एक महत्त्वाचा घटक असेल.
 

आशका गोराडिया 
अबीगैल पांडे आणि मी 'नच बलिए' पासून एकमेकींना ओळखतो. ती आणि तिचा बॉयफ्रेंड सनम जोहर आता माझ्या कुटुंबासारखे आहेत. अबीने मला योगासने करायला लावली, तिच्यामुळे मला ते करायला भाग पाडले. आता याेगा माझ्या जीवनाचा एक भाग झाला आहे. आता कुठे जाते तर योगा आधी करते. अबी माझी सर्वात चांगली मैत्रिण आहे. आमच्यासाठी फ्रेंडशिप डे फार महत्त्वाचा आहे. ती माझी बेस्ट फ्रेंड फॉरएवर आहे. 
 

सेहबान आझमी 
सहकलाकार रीम शेख माझी चांगली मैत्रीण आहे. आमच्या या गाढ मैत्रीबाबत खूपच कमी लोकांना माहिती आहे. रीमला मी गेल्या एक वर्षापासून ओळखतो. गेल्या वर्षी आम्ही दोघांनी 'तुझसे है राब्ता' या शोची शूटिंग बरोबरच सुरू केली होती. तेव्हापासून जवळपास रोजच आमची बरोबरच शूटिंग सुरू आहे. तिच्या रोमारोमात सकारात्मकता पाहायला मिळते. काहीही शिकण्यासाठी ती नेहमीच अतिशय उत्साहाने तयार असते. त्यामुळे आमची ही मैत्री काळाबरोबर आणखी घट्ट झाली आहे. ती माझी 'बेस्ट फ्रेंड' झाली आहे. 
 

कुश शहा 
मी गेल्या ११ वर्षापासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत काम करत ओ. यात टप्पू सेनाची मैत्री खूपच खास आहे. आमची ऑफ स्क्रीन देखील चांगली मैत्री आहे. आम्ही रोज हा दिवस साजरा करतो. माझ्या जीवनात टप्पू सेनेचा प्रत्येक सदस्य 'राज अनादकत, निधी भानुशाली, समय शहा, भव्य गांधी आणि अजहर शेख आदी एकमेकांचे जीवलग मित्र आहेत.