आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्री असावी तर अशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन 1968-69 मध्ये मी दहावीला वैजापूरला जिल्हा परिषद शाळेत शिकत होतो. माझे वर्गमित्र काशिनाथ गायकवाड सध्या अग्रगण्य व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहेत. मार्च महिन्यात दहावीची परीक्षा होती. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. दुपारपर्यंत शाळा आणि दुपारनंतर रानात जाऊन गाई-म्हशींचे वाळलेले शेण तसेच गवत गोळा करत होतो. ते विकायचे अशी कामे करत होतो. माझ्याजवळ दहावीची पुरेशी पुस्तके नव्हती. इंग्रजी विषय तसा अवघड होता. आणि नेमके त्याच विषयाचे पुस्तक माझ्याकडे नव्हते. काशिनाथ गायकवाड यांचे तेव्हा गावातील सर्वात मोठे किराणा दुकान होते, आजही आहे. मी त्यांना म्हटले, काशिनाथ मला इंग्रजीचे पुस्तक व त्याचे गाइड 15-20 दिवसासाठी अभ्यासाला द्या. त्यांनी मला जानेवारीत ती पुस्तके दिली. या विषयाचा जोमाने अभ्यास सुरू केला. 15 मार्चला परीक्षेचा पहिला दिवस होता. पहिला पेपर इंग्रजीचाच होता. 14 मार्चला रात्री 8 च्या सुमारास तो माझ्याकडे आला आणि पुस्तक तसेच गाइडची मागणी केली. मी त्याची माफी मागत त्याला पुस्तके परत केली. या दोन-तीन महिन्यांत पुस्तके परत करायचे विसरून गेलो. त्याला माझी परिस्थिती माहिती असल्याने त्यानेही पुस्तके मागितली नव्हती. मला पेपर खूप सोपा, मात्र माझ्या मित्राला अवघड गेला, पण त्याने एका शब्दाने मला दुखावले नाही किंवा माझ्यावर ठपका ठेवला नाही. मित्र असावा तर असा, परंतु बर्‍याचदा याचे वाईटही वाटते की, माझ्या निष्काळजीपणामुळे मी त्याला पुस्तके परत केली नाहीत. आजही आम्ही चांगले मित्र आहोत. परिस्थिती बदलली असली तरी मला या गोष्टीची जाणीव आहे. त्याच्या सहकार्यामुळे पुढच्या भविष्याची वाटचाल चांगली करू शकलो. माझा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यात त्याचाही महत्त्वाचा वाटा आहेच. मैत्रीत गरीब-श्रीमंत, जातपात, वर्णभेद याला थारा नसतो. ती निखळ मैत्री असते.