Business special / देशातील पहिले इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग स्टेशन झाले सुरू, ऑनलाइन करता येईल बुकिंग


ऑनलाइन बघू शकणार जवळचे चार्जिंग स्टेशन

दिव्य मराठी वेब

Jun 12,2019 06:44:00 PM IST

यूटिलिटी डेस्क- दिल्लीमध्ये मंगळवारी देशातील पहिल्या चार्जिंग स्टेशनची सुरूवात झाली असून याचे नाव स्मार्ट पब्लिक इलेक्ट्रिक वाहन असे आहे. दक्षिण एक्सटेंशन पार्ट 2 मध्ये असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन ऊर्जा मंत्री मा. सत्येंद्र जैन यांनी केले. यात एका पॅनलमध्ये दोन गाड्या चार्ज केल्या जाऊ शकतात. त्यामुळे एकदा चार्जिंग करण्यासाठी लोकांना 160 ते 200 रूपये मोजावे लागतील. तसेच कार चार्जिंग करण्यासाठी 1.60 रूपये प्रति किलोमिटरपर्यंत खर्च येईल.

ऑनलाइन बघू शकणार जवळचे चार्जिंग स्टेशन
ही संकल्पना एका इलेक्ट्रीफाइड मोबाइल अॅपद्वारे काम करते. यावर वाहन मालक जवळचे चार्जिंग स्टेशन, कोणते चार्जिंग पोर्ट रिकामे आहे तसेच यासाठी किती प्रतिक्षा करावी लागेल या सर्व गोष्टी ऑनलाइन पाहू शकतात. इतकेच नाही तर प्रतिक्षा करण्यापासून वाचण्यासाठी ऑनलाइम पैसे भरून एक चार्जिंग स्लॉट बुक करू शकता.

150 चार्जिंग स्टेशन तयार करण्याचा प्लॅन
बीएसईएसचे सीईओ अमल सिन्हानुसार, सध्या दिल्लीमध्ये सुमारे 2500 इलेक्ट्रॉनिक कार आहेत. त्यामुळे कंपनीने त्यांना चार्ज करण्यासाठी दक्षिण एक्स पार्ट 2 मध्ये दोन चार्जिंग पॅनल बसवले आहेत. यात एका पॅनलमध्ये दोन गाड्या चार्ज केल्या जाऊ शकतात. तसेच, या आर्थिक वर्षाच्या शेवटी जवळपास 50 ठिकाणी चार्जिंग स्टेशनची निर्मिती करण्याची आमची योजना आहे.

येणाऱ्या पुढील काही वर्षात 150 चार्जिंग स्टेशन तयार करण्याची योजना आखली जात आहे. येणाऱ्या काळात दिल्लीमध्ये इलेक्ट्रॉनिक कारची संख्या वाढणार असल्यामुळे चार्जिंग स्टेशन आवश्यकता निर्माण होईल. त्यामुळे कंपनीने त्याठिकाणी हे स्टेशन तयार करण्याचे काम सुरू केले ज्याठिकाणी सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक गाड्या आहेत.

X
COMMENT