आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Frog Stem Cells Become The World's First Living And Self Healing Robot, Smaller Than 1 Mm In Size

बेडकाच्या स्टेम सेल्सपासून पहिला जिवंत रोबोट तयार, आकार अवघा १ मिलिमीटर; कॅन्सरवरील उपचारात ठरणार उपयोगी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्मोट, टफ्टस् विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शरीरात फिरू शकणारा रोबोट केला तयार
  • जेनोबोट्स बायोलॉजिकल मशीन, काही आठवडे जिवंत राहील

न्यूयॉर्क - अमेरिकी शास्त्रज्ञांनी आफ्रिकन जातीच्या एका बेडकाच्या स्टेम सेल्सपासून पहिला जिवंत आणि सर्वात लहान रोबोट तयार केला आहे. याचा अाकार इंचाचा २५ वा भाग म्हणजे १ मिमी इतका आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे मानवी शरीरात हा रोबोट सहज संचार करू शकेल. सोबत काही आठवडे तो जिवंत राहू शकेल. एकत्रित समूहातही तो काम करू शकेल. या सूक्ष्म रोबोटचा वापर शरीरातील कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासोबतच समुद्रातील मायक्रोप्लास्टिक नष्ट करण्यासाठी होऊ शकतो. अमेरिकेतील वर्मोट आणि टफ्ट्स विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे या रोबोटची निर्मिती केली. याचे नाव “जेनोबोट्स’ असे ठेवण्यात आले 
असून हे नव्या जीवनाचेच रूप आहे, असे शास्त्रज्ञ म्हणतात.वर्मोट विद्यापीठातील संशोधक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तज्ञ जोश बोंगार्ड म्हणाले, “हा रोबोट एक आगळीवेगळी मशीन आहे. तीही अगदी जिवंत. जेनोबोट्स पारंपरिक रोबोटसारखा दिसत नाही. मांसाच्या एखाद्या तुकड्यासारखा याचा आकार आहे. एक जैविक मशीनच समजा. समुद्रातील रेडिओअॅक्टिव्ह वेस्ट, मायक्रोप्लास्टिक एकत्र करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. मानवी शरीरात तो औषधे घेऊन जाऊ शकतो. अगदी रक्तवाहिन्यांतही तो सहज संचार करू शकतो. शरीरात दिल्या जाणाऱ्या औषधांतही तो सहज टाकता येऊ शकतो.’ टफ्ट्स विद्यापीठातील एक अन्य संशोधक प्रो. मायकल लेविन म्हणाले, “या जिवंत रोबोटचे आपण अनेक प्रयोग करू शकू. सध्या ही आपण केवळ कल्पनाच करू शकतो. जे काम मशीन करू शकत नाही ते या रोबोटच्या माध्यमातून सहजपणे करता येईल. हा शोध भविष्यात स्टेम सेल्स आणि मानवाच्या दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.’स्वत:वर उपचाराची क्षमता, तोडला तर स्वत:च तो जुळेल
 
बेडकाच्या भ्रूणातील जिवंत स्टेम सेल्स काढून त्यांना अंड्यावर सोडण्यात आले. नतंर पेशी विभागल्या गेल्या आणि सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने तयार केलेल्या विशेष स्वरुपात त्या शरीर रचनेसारखा बदलला. निसर्गातही असे घडल्याचे आपण पाहिले नसल्याचा संशोधकांचा दावा आहे. त्वचेतील पेशींनी ही रचना तयार केली, तर हृदयातील मांसपेशीतील पेशींनी रोबोटला आपोआप हालचाली करता येतील अशी क्षमता दिली. जेनोबोट्स स्वत:वर इलाजही करू शकतो. शास्त्रज्ञांनी या रोबोटचे तुकडे केले तेव्हा तो स्वत:हून जोडला गेला आणि तंदुरुस्त झाला.

बातम्या आणखी आहेत...