आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From 24 Years Ago, The Money From The First Exhibit Started Work By The Two Sewing Machine; Named In Forbes Asia's Top 50 Business Women ...

24 वर्षांआधी पहिल्या प्रदर्शनातल्या रकमेतून दाेन शिलाई यंत्रांनी काम सुरू; फोर्ब्जच्या आशियातल्या अव्वल 50 व्यावसायिक महिलांमध्ये नाव...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिता डोंगरे - Divya Marathi
अनिता डोंगरे
  • मुंबईत व्यवसाय सुरू करून 'हाऊस ऑफ अनिता डोंगरे' कंपनीने मॉरिशस तेे मॅनहटनपर्यंत २७२ स्टाेअर सुरू केले
  • नाेकरदार महिलांची सुुविधा लक्षात घेऊन सिंपल ट्राऊझरसारखे अनेक पेहराव तयार केले
  • मिडल्टनपासून सोफी ग्रेगोइरेसारख्या सेलिब्रिटी क्लायंट

नवी दिल्ली : मुंबईच्या अनिता डाेंगरे यांनी वर्ष १९९५ मध्ये आपली बहीण मीना सेहराच्या मदतीने केवळ दाेन शिलाई यंत्रांनी फॅशन व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या हाऊस अाॅफ अनिता डाेंगरे कंपनीची माॅरिशसपासून मॅनहटनपर्यंत २७२ स्टाेअर्स आहेत. त्यांनी डिझाइन केलेल्या पेहरावांची अँड, ग्लाेबल देसी, अनिता डाेंगरे आणि अनिता डाेंगरे ग्रासरूट या चार ब्रँड नावाने जगभरात विक्री हाेते. त्यांच्याकडे अांतरराष्ट्रीय सेलिब्रिटी केट मिडलटनपासून ते कॅनडाची प्रथम महिला साेफी ग्रेगाेइरे ट्रुडाेसारखे क्लायंट अाहेत. फॅशन शाेमध्ये कॅटरिना कैफ, करिना कपूर-खान, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, शाहिद कपूरपासून प्रियंका चाेप्राचा दीर केव्हिन जाेनास व त्यांची पत्नी डेनियम जाेनास यांचा समावेश आहे. इतक्या कमी वयात फॅशन जगतात नाव काेरलेल्या अनिताचा फोर्ब्जने आशियातील पॉवरफुल बिझनेस वुमन ५० च्या यादीत समावेश केला आहे. त्या आपल्या कंपनीमध्ये चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर पदावर काम करतात.

१९९५ मध्ये घराच्या व्हरंड्यात लहान बहिणीबराेबर सुरू केले फॅशन डिझायनिंगचे काम


अनिता म्हणते, आपली सुरुवात खूप लहान हाेती. मुंबईतल्या एसएनडीटी वुमन्स युनिव्हर्सिटीतून डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले. नंतर स्वत:चा फॅशन बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला व घराच्या बाल्कनीमध्ये अापल्या लहान बहिणीबराेबर दाेन शिलाई यंंत्रांच्या मदतीने काम सुरू केले. शिलाई यंत्राचे पैसेदेखील त्यांनी काॅलेजमध्ये झालेल्या प्रदर्शनातून मिळालेल्या कमाईतून दिले. सगळ्यात आधी ५,००० रुपयांचे एक कलेक्शन तयार केले. ते मुंबईच्या बुटीकला पाठवले. तीस वर्षांपूर्वी त्या एक मास्टरजी आणि दाेन टेलरबराेबर बसून डिझाइनबद्दल विचार करायच्या.

पायजम्याला खिसा लावणाऱ्या पहिल्या डिझायनर


अनिताच्या मते, त्यांच्या पहिल्या फॅशन लेबलचे नाव मास हाेते. त्या वेळी काेणतेही स्टाेअर लेबलच्या नावावर कपडे विक्री करत नव्हते. पण त्यांचा अधिकृत पहिला ब्रँड १९९९ मध्ये लाँच झाला. सिंपल ट्राऊझरसारखे पेहराव महिलांसाठी तयार करणारा हा त्या वेळचा पहिला असा ब्रँड हाेता. हा पेहराव अशा महिलांसाठी हाेता, ज्या नाेकरीच्या निमित्ताने प्रवास करायच्या. असे कपडे तयार करण्याची त्यांची इच्छा हाेती, जे त्यांना ग्लाेबल लूक देतील. अंदाजे ८ वर्षांआधी त्यांच्या कंपनीने ब्रायडल वेअर सुरू केले. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे जड व महाग पायजाम्यांचा ट्रेंड ताेडला.

वयाच्या १३-१४ वर्षांपासून त्यांचा डिझाइनकडे कल, आज २००० लाेकांबराेबर काम करत आहेत


अनिता म्हणतात जवळपास १३-१४ वर्षांची असतानाच त्यांचा डिझायनिंगकडे कल हाेता. पण एसएनडीटीमध्ये शिकताना त्यांना डिझायनिंगमध्ये खरी आवड निर्माण झाली. काॅलेजमध्ये पाऊल टाकताच आपला जन्म डिझायनिंगसाठीच झाला असल्याची जाणीव मला झाली. नंतर त्यांनी अरमानी, केल्विन आणि त्या वेळच्या प्रसिद्ध डिझायनरचा अभ्यास केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी तेथे २ वर्षे शिकवले व एका डिझायनिंग हाऊसमध्ये कामही केले. आज त्यांची कंपनी जवळपास २००० लाेकांबराेबर काम करत आहे.