Home | Gossip | From Amitabh Bachchan to Kajol, Rani Mukherjee know the Kishore Kumars Relation With these Bollywood Celebs

कपूर घराण्यापासून ते अमिताभ बच्चन, काजोल, राणी मुखर्जीपर्यंत, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आहेत किशोर कुमार यांचे नातेवाईक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 02:50 PM IST

किशोर कुमार यांचे सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींसोबत जवळचे नाते आहे. काजोल ही किशोर कुमार यांच्या बहिणीची नात आहे.

 • From Amitabh Bachchan to Kajol, Rani Mukherjee know the Kishore Kumars Relation With these Bollywood Celebs

  लोकप्रिय गायक किशोर कुमार यांचे हिंदी सिनेसृष्टीतील योगदान सर्वांनाच माहिती आहे. आजही या गायकाच्या गाण्यांची जादू कायम आहे. हिंदी सोबतच मराठी सिनेमातही किशोर कुमार यांचे योगदान आहे. किशोरदांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी गायली असून ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. किशोर कुमार यांनी हिंदी, मराठी, आसामी, गुजराती, कन्नडा, भोजपुरी, मल्याळम, ओरिया आणि ऊर्दू या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. जवळजवळ आपली 40 वर्षे त्यांनी भारतीय सिनेजगताला दिली. देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चनपासून ते नवीन पिढील अनिल कपूरपर्यंत किशोर दांनी अभिनेत्यांना आपला आवाज दिला.


  किशोर कुमार यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचे म्हणजे त्यांनी एकुण चार वेळा लग्न केले होते. या चार लग्नांमुळे त्यांचे नाते सिनेसृष्टीतील अनेकांशी आहे. जाणून घेऊयात सिनेसृष्टीतील किशोर कुमार यांच्या नातेसंबंधांविषयी..

 • From Amitabh Bachchan to Kajol, Rani Mukherjee know the Kishore Kumars Relation With these Bollywood Celebs

  - किशोर कुमार यांचे पहिले लग्न रुमा गुहा ठाकुरतासोबत झाले होते. त्यांचे लग्न आठ वर्षे टिकले. गायक अमित कुमार किशोर आणि रुमा यांचा मुलगा आहे. रुमा या बिजॉय राय यांच्या भाची होत्या. बिजॉय राय या सत्यजीत राय यांच्या पत्नी होत्या. 

   

  - आठ वर्षे रुमा यांच्यासोबत संसार केल्यानंतर किशोर कुमार यांनी त्यांना घटस्फोट दिला आणि अभिनेत्री योगिता बालीसोबत दुसरे लग्न केले. ही 1976 ची गोष्ट आहे. पण दोनच वर्षे या दोघांचे नाते टिकले. योगिता या गीता बाली यांच्या भाची आहेत. गीता बालींचे लग्न शम्मी कपूरसोबत झाले होते. याच कारणामुळे किशोर कुमार यांची लिंक कपूर घराण्यासोबतही आहे. 

 • From Amitabh Bachchan to Kajol, Rani Mukherjee know the Kishore Kumars Relation With these Bollywood Celebs

  - कपूर घराण्याविषयी सांगायचे म्हणजे अमतिाभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिचे लग्न राज कपूर यांचा नातू निखिल नंदासोबत झाले आहे. निखिल हा राज कपूर आणि कृष्णा कपूर यांची मुलगी रितू नंदा हिचा मुलगा आहे. रितू कपूर यांचे लग्न बिझनेसमन राजन नंदासोबत झाले होते. किशोर कुमार यांचे योगिता बालीसोबत नाते जुळल्यानंतर त्यांचे फिल्मी दुनियेतील अनेक कलाकारांसोबत नाते जुळले होते.

   

  - किशोर कुमार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर योगिता बालीने मिथून चक्रवर्तीसोबत दुसरे लग्न केले होते. दरम्यानच्या काळात श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती यांचे अफेअर असल्याची चर्चा होती. श्रीदेवी यांचे बोनी कपूरसोबत लग्न झाले होते. बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर यांच्या वडिलांचे नाव सुरेंद्र कपूर आहे. सुरेंद्र एकेकाळी गीता बाली यांचे सेक्रेटरी होते. 

 • From Amitabh Bachchan to Kajol, Rani Mukherjee know the Kishore Kumars Relation With these Bollywood Celebs

  - किशोर दांनी तिसरे लग्न मधुबालासोबत केले. मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमप्रकरणाविषयी सगळ्यांनाच ठाऊक आहे. किशोर दांसोबत लग्नापूर्वी मधुबाला दिलीप कुमार यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मधुबालाच्या निधनानंतर किशोर कुमार यांनी अभिनेत्री लीना चंद्रवारकरसोबत चौथे लग्न केले.  लीना चंद्रावरकरांचा पहिला चित्रपट "बचना ऐ हसीनों"चे शीर्षक गीत किशोर कुमार यांनी गायले होते.

   

 • From Amitabh Bachchan to Kajol, Rani Mukherjee know the Kishore Kumars Relation With these Bollywood Celebs

  - या चार लग्नांव्यतिरिक्त किशोर कुमार यांचे काही सेलिब्रिटींसोबतचे नाते त्यांचे थोरले भाऊ अशोक कुमार यांच्यासोबतही जुळले. अशोक कुमार यांची मुलगी प्रीती गांगुली हिचे लग्न अभिनेते देवेन शर्मासोबत झाले होते. 

   

  - अशोक कुमार, अनूप आणि किशोर कुमार यांना एक बहीण होती. सती देवी हे त्यांचे नाव होते. 

 • From Amitabh Bachchan to Kajol, Rani Mukherjee know the Kishore Kumars Relation With these Bollywood Celebs

  - सती देवी यांचे लग्न शशधार मुखर्जीसोबत झाले होते. त्यांना रोनू, जॉय, देब, शोमू, शुबीर आणि शिबानी मुखर्जी ही पाच मुले झाली. काजोल आणि तनिषा या शोमू मुखर्जी आणि तनुजा यांच्या मुली आहेत. तनुजाची थोरली बहीण अभिनेत्री नुतन होती. राणी मुखर्जीसुद्धा सती देवी यांच्या नात्यात आहे. याशिवाय दिग्दर्शक अयान मुखर्जी हा देब मुखर्जींचा मुलगा आहे. अशा प्रकारे काजोलपासून ते राणीपर्यंत मुखर्जी कुटुंबासोबतही किशोर कुमार यांचे जवळचे नाते आहे.  

   

Trending