आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From Congress Dr. Vishwas Zade Is Candidate Against Finance Minister Sudhir Mungantiwar

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याविराेधात काँग्रेसकडून डाॅ. विश्वास झाडेंना उमेदवारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप- शिवसेना युतीला सर्वत्र चांगले यश मिळाले असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाने राज्यात काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून देत धक्कादायक निकाल दिला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसला ३१ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामागील राजकीय पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी होती. यंदाही बल्लारपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस असा थेट राजकीय संघर्ष झडण्याची चिन्हे आहे. भाजपच्या पहिल्या यादीत मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर झाली. काँग्रेसने हृदयरोग तज्ज्ञ डाॅ. विश्वास झाडे यांना उमेदवारी दिली आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर आणि चंद्रपूर तालुक्याच्या काही भागाचा समावेश असलेला हा मतदारसंघ संमिश्र समाजरचना असलेला भाग म्हणून ओळखला जातो.


वैद्यकीय रुग्णालय, कॅन्सर रुग्णालयासह अनेक कामे पाच वर्षांत
जातीचे कार्ड चाल
णार
काँग्रेसने यंदा चंद्रपूरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विश्वास झाडे यांच्या रूपाने तेली समाजाचे कार्ड खेळले आहे. डॉ. झाडे हे काँग्रेसमध्ये सक्रिय नाहीत. त्यामुळे मुनगंटीवारांना आव्हान देतील का, अशी चर्चा आहे. वंचित आघाडी, बसपने अद्याप पत्ते उघड केलेले नाहीत. जातीय समीकरण लक्षात घेऊनच हे पक्ष उमेदवार निश्चित करण्याची शक्यता दिसत आहे. तथापि, प्रमुख लढत भाजप व काँग्रेस अशीच हाेऊ शकते.

२००९ च्या मतदारसंघ फेररचनेत चंद्रपूर अारक्षित झाल्याने मुनगंटीवार झाले 
१९९५, १९९९, २००४ अशा तीन विधानसभा निवडणुकांमध्ये चंद्रपूरमधून बाजी मारणाऱ्या मुनगंटीवार यांना २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत चंद्रपूर आरक्षित झाल्याने बल्लारपूरकडे सरकावे लागले. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे घनश्याम मूलचंदानी यांचा, तर २००९ च्या निवडणुकीत त्यांनी राहुल पुगलिया यांना पराभूत करून विधानसभा गाठली होती. आजवर अपराजित मुनगंटीवार यंदा सहाव्यांदा विधानसभेच्या रिंगणात असतील.

कामांत मुनगंटीवार आघाडीवर
मुनगंटीवार यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांची यादी मोठी आहे. देशातील सर्वात मोठी सैनिकी शाळा, वन अकादमी, रोजगाराच्या दृष्टीने बांबू प्रशिक्षण केंद्राची स्थापना, वैद्यकीय व कॅन्सर रुग्णालयासह मोठी कामे त्यांच्या नावावर आहेत. आदिवासी मुलांमधून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्याचा मिशन शक्ती प्रकल्प चर्चेत आहेे. या भागात बेराेजगारीचे प्रमाण मात्र कमी हाेऊ शकलेले नाही.

जातीय समीकरणे
औद्योगिकीकरणाने या भागात हिंदी आणि तेलगू भाषिकांची संख्याही बऱ्यापैकी आहे. तेली, माळी, कुणबी, आदिवासी व अनुसूचित जातींचेही प्राबल्य आहे. पूर्वी या भागात जातीपातींच्या समीकरणांवर फार भर दिला जात नव्हता. मात्र, लोकसभेपासून ही समीकरणे टोकदार बनली. त्यामुळे भाजपच्या चिंता वाढल्या. स्वत: मुनगंटीवार हे अल्पसंख्याक कोमटी समाजाचे प्रतिनिधित्व करत असले तरी (आर्य वैश्य ) भाजपचे जिल्ह्यातील मजबूत नेटवर्क आणि मुनगंटीवार यांची विकास पुरुष म्हणून व्यक्तिगत प्रतिमा सातत्याने त्यांच्या यशाला हातभार लावून जाते.

बातम्या आणखी आहेत...