आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियात ९५ वर्षांत कधीही ९१ टक्क्यांहून कमी झाले नाही मतदान, स्वत:चे घर नसलेले ६ पंतप्रधान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियात शनिवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान हाेणार आहे. सरकारने १९२४ मध्ये मतदान अनिवार्य असल्याचा नियम केला हाेता. तेव्हापासून येथे ९१ टक्क्यांहून कमी मतदान झाले नव्हते. १९९४ मध्ये तर ९६.२२ टक्के मतदारांनी हक्क बजावला हाेता. 


मतदान अनिवार्य केल्यामुळे लाेक राजकारण व सरकारी कामकाजातही रस घेतात, असे आॅस्ट्रेलिया सरकारचे म्हणणे आहे. लाेक सक्रिय हाेऊन नाेंदणी करतात. देशात १८ किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लाेक मतदान करू शकतात. मतदानाचा हक्क बजावला नाही तर सरकार मतदारांना त्याचा जाब विचारते. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास मतदान चुकवणाऱ्यास १ हजार रुपयांचा दंड भरावा लागताे. या नियमाला काही संघटनांनी विराेधही केला. हा नियम लाेकशाही आधार असलेल्या स्वातंत्र्य या मूल्याच्या विराेधातील आहे, असा दावा विराेधक करतात. सरकार निवडण्याच्या प्रक्रियेत जनतेचा सहभाग असला पाहिजे. त्यासाठी हा नियम महत्त्वाचा असल्याचे या नियमांचे समर्थक म्हणतात. आॅस्ट्रेलियात दर तीन वर्षांनी सार्वत्रिक िनवडणूक हाेते. सरकार मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांच्या साेयी-सुविधांवर भर देते. स्वत:चे घर नसलेले लाेक प्रवासी मतदार म्हणून आपली नाेंदणी करू शकतात. रुग्णालयात उपचार घेत असलेले मतदार पाेस्टल बॅलेटने मतदान करतात. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पाेहाेचू शकत नाहीत अशा मतदारांसाठी तारखेच्या आधी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. जगभरात २३ देशांत मतदान अनिवार्य आहे. 
 

१२ वर्षांत सर्वाधिक दिवस सत्तेवर ज्युलिया गिलार्ड
ऑस्ट्रेलियात १२ वर्षांत ६ पंतप्रधान झाले आहेत. २००७ मध्ये केव्हिन रेड पंतप्रधान झाले हाेते. ते ९३४ दिवस पंतप्रधान हाेते. ज्युलिया गिलार्ड - १०९९ दिवस, रेड २०१३ मध्ये केवळ ८३ दिवस ,२०१३ मध्ये टाेनी अॅबाेट ७२७ दिवस, मॅल्कम टर्नबुल २०१५ मध्ये  १०७४ दिवस पदावर हाेते. २०१८ मध्ये माॅरिसन यांच्याकडे पदाची सूत्रे आली. त्यांनी २७० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...