आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कवच'पासून ते 'सूफियाना प्यार मेरा'पर्यंत,  या वर्षाअखेर 6 मालिका होणार बंद, टीआरपी ठरले कारण  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  2019 हे वर्षे संपायला फक्त दोन महीने उरले आहेत. यादरम्यान इंडियन टेलीव्हिजन इंडस्ट्रीत खूपच उलथापालथ होणार आहे. एकीकडे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' सारख्या मालिका लोकांच्या पसंतीस पडत आहेत. त्यामुळे चॅनलदेखील त्यात रस घेत आहेत. दुसरीकडे काही अशा मालिका आहेत ज्या आता सुरू झाल्या मात्र टीआरपी मिळत नसल्यामुळे वर्षाअखेर त्या बंददेखील होणार आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील 6 लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार असल्याची बातमी आहे. जाणून घेऊया या मालिकांविषयी...

  • राजा बेटा, रिलीज डेट: 15 जानेवारी 2019

कथेत अनेक बदल करूनही सीरियल "राजा बेटा' प्रेक्षकांचे मने जिंकू शकले नाही. ही मालिका राउल सुधीर, शंभन मोहनते यांच्या मुख्य भूमिकेत सुरू करण्यात आली होती. त्यानंतर दोघांनाही बदलण्यात आले. त्यानंतर निर्मात्यांनी दिशांक अरोरा आणि प्रणाली घोघरे यांना मुख्य भूमिकेत घेतले. तरीही मालिकेच्या टीआरपी रेटिंग मध्ये फरक पडला नाही. आताही मालिका या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंद होईल.

  • सूफियाना प्यार मेरा, रिलीज डेटः 16 एप्रिल 2019

सूत्रानुसार ही मालिका याच वर्षी एप्रिलमध्ये सुरू झाली होती. कथेनुसार ही मालिका संपणार आहे. निर्मात्यांनीदेखील याला नोव्हेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतून अभिनेत्री हेली शाहला दुहेरी भूमिका करण्याची संधी मिळाली. ती म्हणते...,या मालिकेत अनेक वळणे आली, लोकांना ती आवडलीदेखील. माझी दुहेरी भूमिकेलाही पसंती मिळाली.

  • हमारी बहू सिल्क, रिलीज डेट: 3 जून 2019

जान खान आणि चाहत पांडे स्टारर "हमारी बहू सिल्क' अपेक्षेपेक्षा िनराशा केली. ही मालिका याच आठवड्यात बंद होणार आहे.

  • कवच 2, रिलीज डेट : 25 मे 2019

दीपिका सिंगचा कमबॅक शो 'कवच' लवकरच बंद होणार आहे. खरं तर, चॅनेलकडे ही मालिका बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण टीआरपी कमी असल्याचे बोलले जात आहे. शोच्या क्रू मेंबर्स आणि कलाकारांनी शूटिंग पूर्ण केले असून या मालिकेचा शेवटचा भाग 20 नोव्हेंबरला प्रसारित होणार आहे.

  • इशारों इशारों में, रिलीज डेट : 15 जुलै 2019

मुदित नायर आणि सिमरन स्टारर ही "इशारों इशारों में' मालिकाही बंद होणार. या वर्षाअखेर ही मालिका बंद करण्याचा निर्णय झाला आहे. याचे कारण मालिकेचा टीआरपी कमी असल्याचे सांगितले जात आहे.

  • गठबंधन, रिलीज डेट : 15 जानेवारी 2019

"गठबंधन', ही मालिका एका महिला पोलिस आणि स्मार्ट मुलाच्या प्रेमकथेवर आधारित आहे. ती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बंद होईल. शोमध्ये अबरार काजी आणि श्रुति शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या जागी "शुभ आरम्भ' ही मालिका येईल.

बातम्या आणखी आहेत...