आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील सीजनमध्ये 'नो बॉल'साठी असेल वेगळा अंपायर, पावर प्लेअर नियम तुर्तास लागू नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- आयपीएलच्या पुढील सीजनमध्ये पावर प्लेअर नियम लागू होणार नाही. आयपीएल गवर्निंग काउंसिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर, सामन्यादरम्यान नो बॉल पाहण्यासाठी वेगळा अंपायर असेल, जो मैदानातील अंपायर्सला नो बॉलची माहिती देईल. चेअरमॅन बृजेश पटेलच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील सीजनमध्ये मुंबई आणि बँगळुरूमध्ये झालेल्या सामन्यात अंपायर एस रवी यांना मलिंगाचा नोबॉल दिसला नव्हता, त्यामुळे बंगळुरूला सामना गमवावा लागला होता.सामन्यानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने खराब अंपायरिंगवर प्रश्न उपस्थित केले होते. तर, दुसरीकडे राजस्थानविरुद्ध सामना खेळताना नो बॉल विवादानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मैदानात येऊन अंपायरसोबत बाचाबाची केली होती. बोर्डाने याच प्रकरणांना समोर ठेऊन हा नवीन निर्णय घेतला आहे.

आयपीएल गवर्निंग काउंसिलला टेक्नोलॉजीचा उपयोग करायचा आहे
 
बैठकीनंतर काउंसिलच्या एका सदस्याने सांगितले की, नोबॉल चेक करण्यासाठी वेगळा अंपायर असेल. हा तिसऱ्या आणि चौथ्या अंपायरपेक्षा वेगळा असेल. आम्हाला फक्त टेक्नोलॉजीचा वापर करायचा आहे. अंपायर पाय आणि उंचीचे नो बॉल पाहील. बैठकीत निर्णय घेण्यात आला की, खेळाडूंचे ऑक्शन 19 डिसेंबरला कोलकातामध्ये होईल. ऑक्शन फक्त एक दिवसाचे असेल.