आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रायगडावरून प्रचाराच्या तुतारीला ‘वंचित’मध्ये फाटा; माेहीमच गुंडाळली!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीप्ती  राऊत 

नाशिक - या निवडणुकीत ‘मराठे हेसुद्धा वंचितच आहेत’ अशी ‘वंचितते’ची अधिक व्यापक व्यूहरचना करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा प्रचार सुरू झाला असून ‘रायगडा’चा मात्र त्यांना विसर पडला आहे. राजमाता जिजाऊ यांचे १३ वे वंशज नामदेवराव जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्यावर मराठ्यांना सामावून घेण्याची पक्षाची रणनीती अधिक ठळक झाली. त्याचाच एक भाग म्हणून महाडच्या चवदार तळ्यासोबत रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. त्यासाठी तीन ऑक्टोबरची तारीखही जाहीर करण्यात आली होती. मात्र या मुद्द्यावरून पक्षांतर्गत नाराजीचे सूर उमटल्यावर ‘रायगड’ मागे पडल्याचे कळते.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाडच्या चवदार तळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रचारास प्रारंभ करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची वेगळी घोषणा केली होती. मात्र, या वेळी राजमाता जिजाऊंंचे १३ वे वंशज नामदेवराव जाधव यानी ‘वंचित’ मध्ये प्रवेश केल्यावर छत्रपती आणि जिजाऊ यांच्या दर्शनाने प्रचारास  प्रारंभ करण्याची कल्पना मांंडण्यात आली. त्यानुसार ३ ऑक्टोबरला रायगड किल्ल्यावरील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन, पाचडला जिजाऊंंच्या समाधीस अभिवादन करून महाडला पहिली सभा घेऊन प्रचार सुरू करण्याचे नियोजन होते. त्यानुसार ‘अठरापगड जातीना सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण बांधणारे बहुजन प्रतिपालक’ असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करून ‘पेशवाई गाडण्यासाठी वंचितच्या बंडाला आशीर्वाद द्या...’ असे आवाहनही तयार करण्यात आले होते. मात्र काही कार्यकर्त्यांची नाराजी, एबी फॉर्मची धावपळ आणि पावसामुळे बिघडलेले हवामान यामुळे ‘रायगडा’ वरून प्रचारचा मुहूर्त टळला आहे.
 

कार्यक्रम पुढे ढकलला
हा कार्यक्रम रद्द झालेला नाही तर पुढे ढकलण्यात आला आहे. त्या दिवशी पावसाचे सावट असल्याने रायगडावर हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी परवानगी न मिळाल्याने नियोजित कार्यक्रम घेता आला नाही. त्या दिवशी हवामान खराब होते. आता प्रचारसभा सुरू झाल्या आहेत, मात्र रायगडावरील कार्यक्रम रद्द झालेला नाही. 
- डॉ. अरुण सावंत, 
महासचिव, वंचित बहुजन आघाडी
 
 

बातम्या आणखी आहेत...