आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • From Rajesh Khanna To Rishi Kapoor, These Bollywood Actors Fight With Cancer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजेश खन्नापासून ऋषी कपूरपर्यंत बॉलिवूडच्या या कलाकारांनी कर्करोगाशी दिली झुंज

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - 4 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जग जागतिक कर्करोग दिन साजरा करत आहे. संपूर्ण जगात कर्करोगाविषयी जागृकता आणि लोकांना यापासून बचाव व उपचाराप्रती प्रेरित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कर्करोगाशी झुंज दिली आहे. 

ऋषी कपूर


बॉलिवूड कलाकार ऋषी यांना गेल्या वर्षी कर्करोग झाला होता. ते अनेक दिवसांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होते. पूर्णपण ठीक झाल्यानंतर ते भारतात परतले. प्रदूषणामुळे त्यांना फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता यामुळे ते काही दिवसांसाठी पुन्हा रुग्णालयात दाखल झाले होते. ताहिरा कश्यप

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आयुष्मान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यपला देखील कर्करोगाने ग्रस्त होती. तिला स्टेज 0 तचा ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. यामुळे अनेक दिवस रुग्णालयात उपाचारासाठी राहावे लागले होते. ताहिराने सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्ट लिहिल्या. जेणेकरून लोकांमध्ये याबाबत जागृकता होईल. 

इरफान खान 


बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान देखील दुर्मिळ कर्करोगाने ग्रस्त होता. त्याने परदेशात अनेक दिवस यावर उपचार घेतले होते. दरम्यान इरफानने यावर विजय मिळवला असून तो आता इंग्लिश मीडियम चित्रपटावर काम करत आहे. 

विनोद खन्ना

बॉलिवूडचे स्टार विनोद खन्ना यांचा 2017 मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला. अखरेच्या दिवसातील त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. 

मनीषा कोईराला


मनीषा कोईराला नोव्हेंबर 2012 मध्ये कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी काठमांडूमध्ये होती. मनीषाने मोठ्या हिमतीने याचा सामना केला आणि 2014 पर्यंत यापासून मुक्ती मिळवली. 

राजेश खन्ना


बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी 'आनंद' चित्रपटात कॅन्सरग्रस्त युवकाची भूमिका केली होती. त्यांचा खऱ्या आयुष्यातही कर्करोगाने मृत्यू झाला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

अनुराग बासु


बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बासु यांना देखील 2004 मध्ये कर्करोग झाला होता.
पण त्याने हार मानली नाही. तीन वर्षे कीमोथेरपी करून बॉलिवूडमध्ये परतला. 

सोनाली बेंद्रे


हम साथ साथ है, कल हो ना हो आणि सरफरोश यांसारख्या चित्रपटात काम केलेल्या सोनाली बेंद्रे देखील कर्करोगाशी लढली आहे. तिला मॅटॅस्टिक नावाचा कर्करोग झाला होता. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. 

फिरोज खान 


कुर्बानी स्टार फिरोज खान यांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. 2008 पासून कर्करोगाशी लढत असताना 27 एप्रिल 2009 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला.