Home | Gossip | From Rishi Kapoor to Abhishek Bachchan, these Bollywood actors have played a gay roles

ऋषी कपूरपासून ते अभिषेक बच्चनपर्यंत, या बॉलिवूड कलाकारांनी मोठ्या पडद्यावर साकारल्या समलैंगिक भूमिका  

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 12:01 PM IST

वेब सीरीज 'मेड इन हेव्हन' मध्ये अर्जुन माथुर गे भूमिका साकारणार आहे

 • From Rishi Kapoor to Abhishek Bachchan, these Bollywood actors have played a gay roles

  बॉलिवूड डेस्क : वेब सीरीज 'मेड इन हेव्हन' मध्ये अर्जुन माथुर गे भूमिका साकारणार आहे. या रोलनंतर अनेक लोक त्याला अश्लील मॅसेजेस पाठवत आहेत, यापैकी अनेकांनी त्याला लग्नाचाही प्रस्ताव दिला आहे. अर्जुनने यापूर्वीही दोनवेळा ऑनस्क्रीन समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारली आहे. कदाचित याचमुळे लोक त्याला खरोखरीच गे समजत आहेत. अर्जुनव्यतिरिक्त अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी स्क्रीनवर समलैंगिक भूमिका साकारल्या आहेत.

  या अभिनेत्यांनी साकारल्या समलैंगिक भूमिका...
  अक्षय कुमार...

  अक्षय कुमार आपल्या माचो इमेजसाठी ओळखला जातो. चित्रपटातील हीरोइनला व्हिलनपासून वाचवणे किंवा हेलीकॉप्टरमधून उडी मारणे. त्याला नेहमीच अॅक्शन पॅक चित्रपटात पहिले गेले आहे. चित्रपट 'ढिशुम'मध्ये अक्षयने गेची भूमिका साकारली आहे. मात्र त्याचा कॅमियो रोल होता.

  मनोज बाजपेयी...
  मनोज बाजपेयी यांनी चित्रपट 'अलीगड'मध्ये एका गे प्रोफेसरचा रोल प्ले केला होता. हा चित्रपट उत्तर प्रदेशमधील एका विश्वविद्यालयातील सत्य घटनेवर आधारित होता. ज्यामध्ये मनोज यांनी श्रीनिवास रामचंद्र सिरसची भूमिका साकारली होती. मनोज मराठीचे प्रोफेसर होते. दोन पत्रकार त्यांचे स्टिंग ऑपरेशन करतात आणि त्यांच्या समलैंगिक असण्याच्या बातम्या वृत्तपत्रात छापतात. त्यांच्या समलैंगिक असण्याबद्दल कळल्यानंतर लगेच त्यांना नोकरीवरून काढले जाते. पूर्ण गोष्ट मनोज यांच्या समलैंगिक असणे आणि नोकरी परत मिळवण्यासाठी कोर्टात केलेल्या संघर्षावर आधारित होती.

  फवाद खान...
  चित्रपट कपूर अँड सन्समध्ये फवाद खान गे रोलमध्ये दिसला. मात्र पूर्ण चित्रपटात त्याला एका परफेक्ट सिंगल मुलाप्रमाणे दाखवले गेले पण शेवटी तो गे असल्याचा खुलासा होतो.

  ऋषी कपूर...
  ऋषी कपूर यांनी पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत. ऋषी हे खूप चार्मिंग अॅक्टर्सपैकी एक आहेत. आपल्या काळातील रोमँटिक हीरो मानल्या जाणाऱ्या अॅक्टरने 2012 मध्ये आलेल्या करण जोहरचा चित्रपट 'स्टुडंट ऑफ द ईयर'मध्ये गे प्रिंसिपल योगेंद्र वशिष्ठची भूमिका साकारली होती.

  अभिषेक बच्चन...
  अभिषेक बच्चनने चित्रपट 'दोस्ताना' मध्ये गे कपलची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटात तो मेल नर्स सॅम बनला आहे. पण एक फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी आपला मित्र अभिसोबत (जॉन अब्राहम)गे पार्टनरचा बनाव करतो. पूर्ण चित्रपटात त्याने गे रोल कॉमेडीसोबत खूप चांगल्या पद्धतीने प्रस्तुत केला आहे.

  शबाना आजमी...
  शाबानी आजनीने चित्रपट 'फायर'मध्ये राधाची लेस्बियन भूमिका साकारली आहे. शबाना हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या पहिल्या अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी स्क्रीनवर लेस्बियन रोल प्ले केला होता. या चित्रपटात तिचे संबंध आपली नणंद सीता (नंदिता दास) सोबत दाखवले गेले आहे. चित्रपट 1996 मध्ये रिलीज झाला होता. दोन्ही अभिनेत्रींच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली.

  साकिब सलीम आणि रणदीप हुड्डा...
  करण जोहरचा चित्रपट 'बॉम्बे टॉकिज' मध्ये साकिब सलीम आणि रणदीप हुड्डा यांनी गे कपलची भुमीका साकारली होती. या चित्रपटामुळे विशेष वादात होता यातील दोन्ही कलाकारांचा किसिंग सीन.

  सोनम कपूर...
  चित्रपट 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा'मध्ये सोनम कपूरदेखील लेस्बियनच्या रोलमध्ये दिसली. हा पहिला असा चित्रपट होता ज्यामध्ये लेस्बियन सब्जेक्टसोबत फॅमिली ड्रामा एकत्र दाखवला गेला होता.

  आयुष्मान खुराना...
  आयुष्मान खुरानाने आपल्या आतापर्यंतच्या करियरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. लवकरच तोदेखील पडद्यावर गे रोलमध्ये दिसणार आहे. आपला पुढचा चित्रपट 'शुभ मंगल ज्यादा सावधान'मध्ये आयुष्मान गे रोलमध्ये असणार आहे. हा चित्रपट त्याचा 'शुभ मंगल सावधान' चा सीक्वल आहे.

Trending