Home | News | From Salman To Priyanka, Have A Sneak Peek At Bollywood Stars And Their Ganpati Pujan

सलमान आपल्‍या घरी केव्हापासून करतात गणेशाची स्‍थापना, वाचा खास माहिती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 14, 2018, 12:40 PM IST

देशभर धूमधडाक्‍यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यात बॉलीवूड सेलेब्ससुद्धा आघाडीवर आहेत.

 • From Salman To Priyanka, Have A Sneak Peek At Bollywood Stars And Their Ganpati Pujan

  मुंबई - देशभर धूमधडाक्‍यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यात बॉलीवूड सेलेब्ससुद्धा आघाडीवर आहेत. आपल्‍या व्‍यस्‍त वेळापत्रकातून अनेक बॉलिवूड कलाकार श्री गणेशाची स्‍थापना करतात. यात सलमान खानचाही समावेश आहे. मात्र गेल्या वर्षी सलमानने आपल्या घरी बाप्पा न बसवता आपली बहीण अर्पिता खानच्या घरी बाप्पांची स्थापना केली होती. सलमान आपल्‍या घरी 'श्रीं'ची आराधना केव्‍हापासून करत आहे, याची खासी माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...


  बहीण अर्पितामुळे गणेशोत्‍सव
  सलमानच्‍या घरात (गॅलेक्सी अपार्टमेंट) एक मंदिर आहे. याच ठिकाणी दरवर्षी त्‍याचे कुटुंबीय गणेशाची स्‍थापना करते. सलमानने सांगितले, अनेक वर्षांपासून आम्‍ही मनोभावे गणेशाची स्‍थापना करतो. माझी बहीण अर्पितामुळे त्‍याची सुरुवात झाली. आपणही इतरांप्रमाणे घरात गणपती मांडवा, असे अर्पिताला वाटत होते. तिच्‍या इच्‍छापूर्तीसाठी आम्‍ही पहिल्‍यांदा घरी गणपती आणला होता.


  सलमान गणेशाचा भक्‍त...
  सलमान म्‍हणाला, माझी गणेशावर खूप श्रद्धा आहे. मी स्‍वत:ला गणपतीचा स्‍पेशल भक्‍त मानतो. मागील काही वर्षांत माझ्यावर अनेक संकटं आलीत. पण, त्‍यातूनही मी सहीसलमात सुटलो ते त्‍याच्‍यामुळेच.


  पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर स्टार्स कसे करतात गणपती पूजन.

 • From Salman To Priyanka, Have A Sneak Peek At Bollywood Stars And Their Ganpati Pujan

  गोविंदा


  लहानपणापासूच मी मोठ्या धूमधडाक्‍यात  गणेशोत्सव साजरा करतो. मला आठवतं माझ्या लहानपणी विरारमध्‍ये राहत असताना गणपती मंडळाच्‍या वतीने माझ्या नृत्‍याचे आयोजन केले जात असे. मी  माइकल जॅक्सन स्टाइलमध्‍ये डान्‍स करत असे. पुढे याच कलेने मला ओळख दिली. गणेशोत्‍सव काळातच तिला प्रोत्‍सोहन मिळाले. आज मी कलाकार, नेता झालो ते गणपतीमुळेच. मला प्रसिद्धी पैसा, प्रेम जे काही मिळाले ते गणपतीमुळेच.  


   

 • From Salman To Priyanka, Have A Sneak Peek At Bollywood Stars And Their Ganpati Pujan

  शिल्‍पा शेट्टी 


  माझ्या माहेरचे आणि सासरचे सर्वजण गणेशाचे भक्‍त आहेत. मी आणि माझा पतीसुद्धा. आमच्‍याकडे दरवर्षी दीड दिवसांचा गणपती बसवला जातो. रीतीरिवाजाप्रमाणे आम्‍ही त्‍याला घरी आणतो आणि स्‍थापना करतो. माझा मुलगा आज लहान आहे; पण घरात गणपती आणला की त्‍याच्‍या आनंदाला उधाण येते.  


   

 • From Salman To Priyanka, Have A Sneak Peek At Bollywood Stars And Their Ganpati Pujan

  श्रद्धा 


  माझी मावशी पद्म‍िणी कोल्‍हापुरे हिच्‍या घरी गणेशोत्‍सव साजरा केला जात असे. मी दरवर्षी गणपतीसाठी तिच्‍याकडे जात होते. त्‍या 10 दिवसांत आम्‍ही मोठी धम्‍माल करत होतो.  या काळात मोदक खाणे मला खूप आवडत होते.  आताही आवडतात आणि लहानपणाएवढीच धम्‍माल आजही करते.


   

 • From Salman To Priyanka, Have A Sneak Peek At Bollywood Stars And Their Ganpati Pujan

  नाना पाटेकर


  आजकाल नाती, मैत्री व्‍हॉट्सअॅपपुरतीच मर्यादित झाली आहेत की काय असे वाटते. वैयक्तिक भेटण्‍यासाठी कुणाकडे वेळच नाही. पण गणेशोत्‍सवानिमित्‍त का होईल, नातेवाईक, जुने मित्र एकमेकांना भेटतात. आमच्‍याकडे पाच दिवसांचा गणपती असतो.  माझा मुलगा  मल्हार आणि त्‍याचे मित्र गणपतीची स्थापना आणि सजावट करतात.  अनेक वर्षांपासून आम्‍ही एकाच दुकानातून  गणपतीची मूर्ती आणतो.  माझ्यापूर्वी माझे वडीलही त्‍याच दुकानात मूर्ती घेत होते. हीच पंरपरा मल्‍हारनेही सुरू ठेवली.  

   

Trending