• Home
  • Party
  • From Salman To Sanjay Dutt Bollywood Stars at Priyanka Chopra Mumbai Reception

शाहरुख-आमिर आणि / शाहरुख-आमिर आणि बच्चन फॅमिली वगळता प्रियांका-निकच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचले अख्खे बॉलिवूड

2 मिनिटांच्या व्हिडिओत बघा, निकयांकाच्या पार्टीत कोण कुणासोबत पोहोचला...

दिव्य मराठी वेब टीम

Dec 21,2018 04:43:00 PM IST


मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 20 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन मुंबईत दिले होते. समुद्रकिनारी असलेल्या वांद्रास्थित हॉटेल ताज लँड्स अँडमध्ये ही ग्रॅण्ड पार्टी रंगली. या पार्टीत सलमानपासून ते संजय दत्तपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले. शाहरुख, आमिर, अक्षय आणि बच्चन फॅमिली मात्र यावेळी अनुपस्थित होती.

सलमान-कतरिनापासून ते दीपिका-रणवीरपर्यंत सर्व पोहोचले...
निकयांकाच्या रिसेप्शनमध्ये सलमान खानसह दीपिका-रणवीर, कतरिना कैफ, स्वरा भास्कर, परिणीती चोप्रा, राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा, करण जोहर, कियारा आडवाणी, यामी गौतम, डाएना पेंटी, नवाज़ुद्दीन सिद्दीकी, दीया मिर्झा, सोफी चौधरी, कार्तिक आर्यन, हरमन बावेजा, जॅकी भगनानी, डिनो मोरया, तनिषा मुखर्जी, गोविंदा, अनिल कपूर, अनुपम खेर, सतीश कौशिक, बॉबी देओल, पूजा हेगडे, राज बब्बर, अमीषा पटेल, साऊथ अॅक्ट्रेस तमन्ना भाटिया, पत्नी प्रियांकासोबत विवेक ओबरॉय, रवीना टंडन, जायरा वसीम, रणधीर कपूर, कंगना रनोट रेखा, विद्या बालन, संजय दत्तसह अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले होते.


1 आणि 2 डिसेंबर रोजी झाले प्रियांका-निकचे लग्न...
प्रियांका-निक यांनी जोधपूरच्या उम्मेद पॅलेस भवन येथे 1 आणि 2 डिसेंबर रोजी लग्न थाटले. 1 डिसेंबर रोजी दोघांचे ख्रिश्चन आणि 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतर 4 डिसेंबर रोजी प्रियांकाने नवी दिल्लीत रिसेप्शन दिले होते. त्याला पीएम मोदींनी हजेरी लावली होती. दुसरे रिसेप्शन 19 डिसेंबर रोजी मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झाले. हे रिसेप्शन प्रियांकाने बिझनेस क्षेत्राशी संबंधत लोकांसाठी आयोजित केले होते.

X
COMMENT