आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माच्या 12 व्या दिवसापासून अाजपर्यंत सर्व गाेष्टी रेबेकाच्या लक्षात, जगात असे फक्त 60 लाेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ही अाहे रेबेका शेरॉक. वय २९ वर्षे. मात्र, तिला जन्मानंतर १२ व्या दिवसांपासून घडलेल्या सर्व घटना लख्खपणे अाठवतात. इतकेच नव्हे, तिला अापल्या अायुष्यातील प्रत्येक दिवस, क्षण अाठवताे, जणू काही ताे काल अनुभवलाय. 


खरे तर रेबेका ‘हायली सुपीरियर ऑटोबायोग्राफिकल मेमरी’ घेऊनच जन्माला अाली हाेती. मात्र, तिच्यासाठी वरदान कमी व शापच जास्त ठरले. अशा अत्यंत दुर्मिळ अाजाराने तिला ग्रासले हाेते. त्याचे कारण म्हणजे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. यामुळे ते अायुष्यातला एकही चांगला, वाईट क्षण विसरू शकलेली नाही. 

 

> पहिला बर्थडे घाबरवताे
रेबेका सांगते, मेंदूत फ्लॅशबॅक कायम सुरू असताे. झाेपतानाही अाठवणी येत राहतात, त्यामुळे झाेप येत नाही. पहिल्या वाढदिवशी भेट मिळालेल्या बाहुलीने ती घाबरली हाेती, तेही अाठवते.
तेव्हाची चव व सुगंधही तिला लख्खपणे अनुभवता येताे.

 

> हॅरी पाॅटर कादंबरी वाचते
जेव्हा मेंदूत विचारांचे वादळ घाेंगावत असते तेव्हा त्यापासून दूर पळण्यासाठी हॅरी पाॅटरची कादंबरी वाचते. कारण अाठवणींपासून मला सुटका हवी असते. १४ व्या वर्षी मी नैराश्याच्या गर्तेत अडकले हाेेते, तेव्हापासून हा अाजार मागे लागला, असे ती सांगते.

 

> थेरपीद्वारे उपचार सुरू
रेबेकावर थेरपीद्वारे उपचार सुरू अाहेत. तिच्यासारख्या समस्येने त्रस्त असलेल्या लाेकांची मी भेट घेते. अशाच समस्येने त्रस्त असलेल्या एका महिलेची भेट झाल्यानंतर मला बरे वाटले. कारण तीच अाेळखू शकते माझी समस्या, असे रेबेका सांगते.

 

> लाेकांना प्रेरणा देण्याचे कामही करतेय रेबेका

रेबेका लाेकांना प्रेरणा देण्याचेही काम करते. अापल्या अायुष्याचे अनुभव इतरांना कथन करते. शालेय जीवनातील अाठवणी तिला जास्त अानंदी ठेवतात.

बातम्या आणखी आहेत...