आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From The Living Room To The Balcony, Look At Hrithik Roshan's Apartment In Photos

लिव्हिंग रुमपासून ते बालकनीपर्यंत, Photos मध्ये बघा हृतिक रोशनचे अपार्टमेंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने वयाची 46 वर्षे पूर्ण केली आहेत.10 जानेवारी, 1974 रोजी मुंबईत जन्मलेला हृतिक अॅक्टिंग, पर्सनल लाइफ आणि लॅव्हिश लाइफ स्टाइलसाठी ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध मॅगझिनने हृतिकच्या लॅव्हिश अपार्टमेंटची झलक दाखवली होती. वडील राकेश रोशन यांचे घर सोडल्यानंतर हृतिक जुहू स्थित या सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे.  

कतरिनाचे घर पाहून हृतिकने फायनल केले होते आर्किटेक्ट :
हृतिकचे हे लॅव्हिश अपार्टमेंट जुहूस्थित प्राइम बीच बिल्डिंगच्या तिस-या मजल्यावर आहे. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत या घराचा आर्किटेक्ट आशिष शाहने सांगितले होते की, कतरिना कैफच्या घराचे डिझाइन्स आवडल्यानंतर हृतिकने त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला होता. हृतिकची इच्छा होती, की हे घर त्याची मुले रिहान आणि रिदानच्या इच्छेनुसार तयार केले जावे. घरातील फर्निचरचे शॉपिंग दुबई आणि हृतिकच्या मेव्हणीच्या स्टोरमधून करण्यात आले आहे. याशिवाय वेगवेगळ्या देशांत व्हॅकेशनवर गेलेल्या हृतिकने आपल्या पसंतीने सामान खरेदी केले आहेत. घरातील भिंतींवर कोटेशन्स लावले आहेत, त्यातील काही हृतिकने लिहिले आहेत.

अक्षय कुमारचा शेजारी आहे हृतिक :
अक्षय कुमार आणि हृतिक रोशन शेजारी-शेजारी आहेत. जुहू स्थित सी-फेसिंग प्राइम बीच बिल्डिंगमध्ये दोघांचा आशियाना आहे. अक्षय या इमारतीत मागील अनेक वर्षांपासून राहत आहे. या इमारतीतील चार फ्लॅट अक्षयचे आहेत. दोघांनी कधीच कोणता सिनेमात एकत्र काम केले नाही. परंतु दोघांमध्ये खूप चांगले नाते आहे. निर्माता साजिद नाडियाडवालासुद्धा याच इमारतीत राहतो.
 

बातम्या आणखी आहेत...