आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या अटकेसाठी मोर्चा; सुभाष घईंवरही शाेषणाचा अाराेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लैंगिक शोषणाच्या आरोपावरून वादात सापडलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवारी काँग्रेसने ओशिवारा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.


अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटादरम्यान नानांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तिने केला आहे. त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी नाना यांच्यासह गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग व निर्माते सामी सिद्दिकी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्यावरही एका लेखिकेने लैंगिक शाेषणाचे अाराेप केले अाहेत. महिमा कुकरेजा या ट्विटर अकाउंटवरून हा अाराेप करण्यात अाला. तर भारतीय गायिका चिन्मयी श्रीपाद हिने श्रीलंकन क्रिकेटपटू मलिंगा याच्यावरही शाेषणाचा अाराेप केला. अायपीएल स्पर्धेच्यावेळी एका हाॅटेलमध्ये नेऊन मलिंगाने लैंगिक शाेषण केले, असा अाराेप चिन्मयीने ट्विटद्वारे केला.


अकबर यांच्याबाबत केंद्र सरकार घेणार निर्णय
नवी दिल्ली : मी टू मोहिमेत लैंगिक शोषणाचा आरोप असलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर शुक्रवारी दुपारी नायजेरियाहून दिल्लीला परतणार आहेत. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच त्यांच्या भवितव्याबाबत केंद्र सरकार व भाजप निर्णय घेणार आहे. गेल्या तीन दिवसात नऊ महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर लैंंगिक शाेषणाचे अाराेप केले अाहेत.

बातम्या आणखी आहेत...