आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20,000 फुट उंचीवर बिघडले विमानाचे इंजिन; तुकडे खाली पडताना खिडकीतून पाहणाऱ्या प्रवाशांचे हरपले भान...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगास- शहरातून उडणाऱ्या फ्रंटीअर एअरलाइनच्या एका विमानाचा एक धक्कादायक व्हि़डिओ समोर आला आहे. लास वेगास विमानतळावरून फ्लोरिडाच्या दिशेने जाणाऱ्या एका विमानाने टेकऑफ केले होते. परंतु काही वेळाने विमान 20 हजार फूटांवर गेल्यानंतर विमानाच्या उजव्या भागातील इंजिनाच्या वरच्या भागाला आग लागल्याने तो भाग जमिनीवर कोसळला. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. विमानातील एका प्रवाशाने या घटनेचा व्हि़डिओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करुन तो शेअर केला होता.

 

पायलटला माहिती मिळताच केली इमर्जन्सी लँडिंग  
विमानाने लास वेगास इथून टेकऑफ केल्यानंतर 15 मिनिटांच्या कालावधीतच इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान 20 हजार उंचीवर पोहचले होते. तेव्हा पायलटला विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने पायलटने लास एंजिलिस विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले.   

 

पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे वाचले प्रवाशांचे जीव

पायलटला विमानात बिघाड झाल्याची माहिती मिळताच त्याने प्रसंगावधान राखत इमर्जन्सी लँडिंग करुन प्रवाशांचे जीव वाचवले.  

बातम्या आणखी आहेत...