स्तन कॅन्सरपासून दूर / स्तन कॅन्सरपासून दूर ठेवतील हे 8 सुपरफूड, आहारात अवश्य समाविष्ट करा

Aug 08,2018 10:56:00 AM IST

सध्याच्या धावपळीच्या जगात महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामधीलच एक ब्रेस्ट कॅन्सर हा आजार आहे. हा आजार जगभरात खूप जलदगतीने वाढत आहे. आज 32 टक्के महिला स्तन कॅन्सरने पिडीत आहेत. बदलती जीवनशैली, उशिरा लग्न होणे आणि जास्त वय झाल्यानंतर मुलांचा जन्म तसेच स्तनपानामध्ये कमतरता या कारणांमुळे महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार होत आहेत. आज आम्ही तुम्हाला स्तन कॅन्सरसारख्या घातक आजाराला दूर ठेवण्यासाठी काही खास उपाय सांगत आहोत.


लाल डाळिंब -
प्रयोगशाळेतील प्राप्त क्लिनिकल संधोधनाच्या माहितीनुसार डाळींबाच्या दाण्यांमध्ये एरोमाटेज नावाच्या अँन्झाइमची क्रियाशीलता कमी करण्याची क्षमता आहे.


पत्ता कोबी -
इंडोल-3-कार्बिनोल नावाचे रसायन पत्ता कोबीमध्ये भरपूर प्रमाणात आढळून येते. आधुनिक संशोधनानुसार या रसायनामुळे स्तन कॅन्सर होण्याची शक्यता खूप प्रमाणत कमी होते.


बीट -
बीटचा काढा मल्टी-ऑर्गन ट्युमर्सची वृद्धी रोखण्यात अतिसक्षम आहे. वैज्ञानिक आता या काढ्याचा वापर इतर कॅन्सर औषधींसोबत उपयोगात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे कॅन्सर औषधींचे साईड इफेक्ट कमी करण्यात मदत मिळेल


लाल मुळा -
लाल मुळ्यामध्ये अँटीओक्सिडेंट्सची मात्रा जास्त प्रमाणात असते, जी स्तन कॅन्सरच्या कोशिका वाढू देत नाही.


रताळे -
यामध्येही अँटीओक्सिडेंट्सची मात्रा भरपूर प्रमाणात असते. रताळ्याच्या आवरणामध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण भरपूर असते. एका शोधानुसार महिलांनी दररोज रताळ्याचे सेवन केल्यास स्तन कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. जपानच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार रताळ्याच्या ज्यूस सेवनाने स्तन कॅन्सरमध्ये होणार्या कोशिकांची वृद्धी होत नाही आणि नवीन कॅन्सर कोशिका निर्माण होण्याचा क्रम बंद होतो.


लाल द्राक्ष -
लाल आणि मोठ्या आकराच्या लाल द्राक्षामध्ये अँटीओक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यांच्या सेवनाने कॅन्सर कोशिकांची वृद्धी कमी होत असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या आजारापासून दूर राहण्यासाठी इतर कोणत्या खास पदार्थांचे सेवन करावे...

सफरचंद - ज्या सफरचंदावर लाल आणि गुलाबी रंग दिसेल, समजावे की त्यामध्ये एन्थोसायनिन्स आणि क्वेरसेटिन (एक प्रकारचे फ्लेवेनोल) नावाचे रसायन भरपूर प्रमाणात आहे. एका संशोधनातील निष्कर्षानुसार हे रसायन कॅन्सर कोशिकांची वृद्धी रोखण्यात सक्षम आहेगाजर - संत्र्याप्रमाणे गाजरामाध्येही भरपूर प्रमाणात बीटा कॅरोटीन नावाचे रसायन आढळून येते ज्यामध्ये अँटीओक्सिडेंटचे गुण असतात. स्तन कॅन्सरवर नियंत्रण ठेवण्यासाठी गाजर उपयुक्त आहे.
X