Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | fruits help to increase Beauty

सौंदर्य : फळांमध्ये दडले आहे सौंदर्याचे रहस्य

वृत्तसंस्था, | Update - Aug 13, 2019, 12:10 AM IST

त्वचेचा मुलायमपणा, नैसर्गिकपणा टिकवून ठेवण्यासाठी काही फळे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. जाणून घ्या, कोणती फळे सौंदर्य खुलवण्यास मदत करतात

  • fruits help to increase Beauty

    त्वचेसाठी व्हिटॅमिनची प्रमुख भूमिका आहे. व्हिटॅमिनला सॅलिसीलिक अॅसिड, बीटा हायड्रोक्सी अॅसिड आणि बीएचए असेही म्हणतात. तेलकट त्वचा आणि पुटकुळ्या उठलेल्या त्वचेसाठी वरील घटक फारच परिणामकारक असतात. त्वचेचा मुलायमपणा, नैसर्गिकपणा टिकवून ठेवते. यासाठी असे काही फळे आहेत ते त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.


    पपई : त्वचेची चमक नैसर्गिकरित्या वाढवते. यातील व्हिटॅमिन ए आणि सी मृत कोशिका दूर करण्यास मदत करते. दुधासोबत पपईचा गर एकजीव करा. नंतर चेहऱ्यावर लावा. पाच मिनिटानंतर पुन्हा थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका. चेहऱ्याची चमक वाढेल. तसेच नैसर्गिकपणा कायम ठेवेल.


    टमाटे : यात कॅल्शियम फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन सी अॅण्टी ऑक्सिडेंट विपुल प्रमाणात आढळतात. या घटकांमुळे त्वचेला फायदा होतो. त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यात त्यांची मदत होते. चेहऱ्यावर मुरूम वाढल्यास त्यात घाण जमा होते. चेहऱ्याचा भाग स्वच्छ करण्यासाठी निंबूचा रस टमाट्यासोबत मिसळून तो पाच मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावा. ज्यामुळे मुरुमाचा भाग कमी होईल. टमाटा किसून ओटमील मिसळा आणि थोडे दही त्यावरून फिरवा. पूर्ण त्वचा पाच मिनिटानंतर धुऊन टाका. खुलून उठेल.


    डाळिंब : यात कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, सी,ई विपुल मात्रेत असतात. डाळिंबाच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण योग्य तऱ्हेने होते. शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्यांनी रोज डाळिंब खावे. डाळिंबाचा ज्यूस पिल्याने त्वचेची चमक वाढते. सुरकुत्या कमी होतात.

Trending