आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठाणामध्ये क्लस्टर विकासासाठी घरमालकासह भाडेकरूंना एफएसअाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जुने नाशिक (गावठाण) परिसरात प्रस्तावित क्लस्टर विकास याेजना राबविताना संभाव्य विराेध टाळण्यासाठी याेजनेत सहभागी हाेणाऱ्या घरमालकांबराेबर भाडेकरूंनाही विशिष्ट प्रमाणात एफएसअाय (चटई क्षेत्र) वा माेबदला देण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती नगरविकास विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे यांनी रविवारी (दि. १२) अायाेजित बैठकीत दिली. हा एफएसअाय घेण्यासाठी भाडेपट्टीची किमान १२ वर्षांची पावती सादर करणे गरजेचे असेल. तसेच, एखाद्या वाड्याच्या मालकाने याेजनेत समाविष्ट हाेण्यास विराेध केल्यास त्या वाड्याला वगळून अन्य भागाचा विकास करणेही शक्य असल्याचे त्या म्हणाल्या. 


जुने नाशिकचा 'क्लस्टर' म्हणून विकास करून चार एफएसआय मंजूर करण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी अामदार देवयानी फरांदे यांनी जुनी तांबट लेनमधील कालिका मंदिर परिसरात विशेष बैठकीचे अायाेजन केले हाेते. गावठाण क्लस्टर याेजनेमुळे येथील नागरिकांचे जीवन सुसह्य हाेईल, असे सांगत भदाणे यांनी याेजना अाणि ती राबविण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती दिली. यावेळी फरांदे म्हणाल्या की, गावठाणातील जुन्या मिळकती, अरुंद रस्ते, उंच-सखल भाग या समस्या नागरिकांना भेडसावत असतात. एखादी दुर्घटना घडली तर अग्निशामक दलाचे विमोचक वाहनही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. 


मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांपर्यंत मदत 
वाडा पडून मृत्यूमुखी पडलेले समर्थ काळे व करण घाेडके यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपये मदत मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू असून चार-पाच दिवसात ही मदत मिळेल, असे अामदार फरांदे यांनी सांगितले.

 
वाडामालक एफएसअायला वाटेकरू हाेऊ देईल? 
क्लस्टर विकास याेजनेतील अडथळे दूर करण्यासाठी भाडेकरूंनाही एफएसअाय देण्यात येणार असला तरी त्यामुळे घरमालक वा वाडा मालकांच्या एफएसअायच्या प्रमाणात घट हाेणार अाहे. देय एफएसअायमधून वाडा मालक व भाडेकरू यांना एफएसअाय देण्यात येईल. त्यामुळे एफएसअायचा वाटेकरू हाेऊ देण्यास वाडा मालक परवानगी देतील का, याबाबत साशंकता व्यक्त हाेत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...