आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातून येणार्‍या या दोन डाळीत प्रचंड केमिकल, थोडेही दुर्लक्ष केल्यास जाऊ शकतो तुमचा जीव!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातून आलेल्या मूग आणि मसूर डाळ खाल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा फूड सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) दिला आहे. FSSAI चा नवा रिसर्च अहवाल समोर आला आहे. या डाळीत मोठ्या प्रमाणात विषारी केमिकल्स आहेत. हे विषारी केमिकल्स आपल्या शरीरात गेल्याने मोठ नुकसान होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.

   

विदेशातून येणारी डाळ घातक..

-FSSAI च्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातून येणाऱ्या डाळीत प्राणघातक केमिकल्स आहेत. लॅबमध्ये घेतलेल्या टेस्टमध्ये हे स्पष्ट झाले आहे. डाळीत 'ग्लायफोसेट' नावाचे विषारी केमिकल आहे. या केमिकलचा वापर शेतात उंदीर मारण्यासाठी केला जातो. मूग आणि मसूरचे सर्वात जास्त उत्पादन ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये घेतले जाते.

 

-FSSAI नी दिला इशारा

मूग आणि मसूर डाळ दररोज खाऊ नये, असा इशारा FSSAI ने दिला आहे.  या डाळ खाल्याने शरीरावर विपरित परिणाम  होतो. दाळीत हर्बीसाइड ग्लायफोसेटची मात्रा जास्त असल्याची संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

-या कारणांमुळे येत आहे भारतात ही डाळ

FSSAI नुसार भारतात ग्लायफोसेट केमिकलची कमाल मात्रा अद्याप ठरवलेली नाही. त्यामुळे ते ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या प्रमाणांचे पालन केले जाते. त्यानुसार भारतात या डाळ आयात केल्या जातात. कॅनेडीयन फूड इन्सपेक्शन एजन्सीने (CFIA) कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये तयार होणाऱ्या हजारो सॅम्पल्सची टेस्ट केली आहे. कॅनडात प्रति अब्ज ग्लायफोसेटचे 282 आणि ऑस्ट्रेलियाच्या डाळीत प्रति अब्ज 1000 ग्लायफोसेटचे कण सापडले आहेत. हे जास्त प्रमाण आहे.

 

एक्सपर्ट काय सांगतात..
 -IIT रुडकीमधून पीएचडी केलेले जीवाजी यूनिव्हर्सिटी ग्वॉल्हेर प्रोफेसर डीडी अग्रवाल यांनी सांगितले की, ग्लायफोसेट एक अत्यंत विषारी केमिकल आहे. शेतातील पिकांवरील कीटक आणि उंदर मारण्यासाठी ग्लायफोसेटची फवारणी केली जाते. हे केमिकल शरीरात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम होतो.
-35 ते 40 दिवसानंतर पिकांवर याचा वापर केला जातो. 10 ते 15 दिवसानंतर याचा परीणाम कमी होतो पण जर या केमिकलची मात्रा जास्त असेल तर त्याचे काही अंश पिकांमध्ये पण जातात.

 

WHO ने या केमिकलवर बंदी घालण्याची मागणी..

भारतातमध्ये काही वर्षापर्यंत ग्लायफोसेट केमिकलला सुरक्षित मानले जात होते. परंतु WHO ने या केमिकलवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या केमिकलचे सेवन बंद करावे, असे WHO ने आपल्या अॅडव्हायजरीत म्हटले आहे. शेतात पिकांच्या संरक्षणासाठी फवारल्या जाणाऱ्या या केमिकलमुळे शरीरावर त्याचे घातक परिणाम होतात. रिपोर्टनुसार ग्लायफोसेटमुळे शरीरातील पाचकतत्वे नष्ट होतात आणि किडनी निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

-डॉक्टरांनी वर्तवला मोठ्या आजाराचा धोका
अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, विदिशाचे सर्जरी विभागचे डॉ.नीरज जैन (MS जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन) यांनी सांगितले की, अन्न धान्य, पालेभाज्या, फळांवर  पेस्टिसाइड्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या शरीराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. 

> पेस्टिसाइड्समध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकलमुळे शरीरावर घातक परिणाम होतो.
> काही काळानंतर आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात कॅन्सर होऊ शकतो.
> पोटाचे विकार होतात.
> यामुळे स्मरणशक्ती कमी होते.
> गरोदर महिलांनी हे असे खाद्य खाल्यास त्याचा होणाऱ्या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

 

इंदूरचे फूड इन्स्पेक्टर मनीष स्वामी यांनी सांगितले की, जेव्हा पण आपण बाहेरुन डाळ खरेदी करतो तेव्हा ती कोणत्या कंपनीची आहे, हे तपासून घ्यावे. विदेशातून आयात केली डाळ ही देशात उत्पादीत डाळच्या तुलनेत आकाराने मोठी व जास्त चमकदार असते.

बातम्या आणखी आहेत...