आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pakistan : दहशतवाद फंडिंग रोखण्यात पाकिस्तान अपयशी, एफटीएफने केले ब्लॅकलिस्ट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन : काश्मीर मुद्द्यावर भारताला अडकवण्याच्या अपयशी प्रयत्नामध्ये गुंग असलेल्या कंगाल पाकिस्तानला आणखी वाईट दिवस पाहावे लागणार आहेत. दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याशी संबंधित निकष पाकिस्तानने पूर्ण केले नसल्यामुळे 'फायनान्शिअल एक्शन टास्क फोर्स' (FATF)ने पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट केले आहे.

भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, एफटीएफच्या आशिया प्रशांत समूहाने पाकिस्तानला मापदंड पूर्ण करु न शकल्यामुळे ब्लॅकलिस्ट केले आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याशी संबंधित 40 मापदंडांपैकी 32 मापदंड पाकिस्तानने पूर्ण केले नसल्यामुळे एफएटीएफने पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे.

पाकिस्तानला होणार नुकसान
ब्लॅकलिस्टमध्ये गेल्यामुळे आणखी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल, कारण या लिस्टमध्ये नाव असलेल्या देशाला कर्ज देणे जोखमीचे मानले जाते. पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या खूप खराब आहे, यासोबतच आंतरराष्ट्रीय कर्जदात्यांनीही पाकिस्तानला आर्थिक मदत आणि कर्ज देणे कमी केले आहे.

2018 मध्ये टाकले होते ग्रे लिस्टमध्ये 
पाकिस्तानला जून 2018 मध्ये ग्रे यादीमध्ये टाकण्यात आले होते. ऑक्टोबर 2018 आणि फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या रिव्ह्यूमध्येही पाकिस्तानला दिलासा मिळाला नव्हता. पाकिस्तान एफटीएफच्या मापदंडानुसार काम करू शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...