आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल आणखी 14 पैशांनी महागले, मुंबईत 90.22 रुपये दर; क्रूड 80 डॉलर प्रति बॅरलच्या पार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> सरकार कच्च्या तेलाची आयात घटवण्याचा विचार करत आहे.

> इंडियन ऑइलचा दावा- तेल महाग झाल्याने मागणी कमी होईल, यामुळे आयात कमी केल्यावर परिणाम होणार नाही.

> एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत पेट्रोल 7% महाग, परंतु विक्रीत कमी नाही.

> डिझेल 5 महिन्यांत 9% महाग, विक्री 14% घटली.


मुंबई - चारही मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल मंगळवारी 14 पैशांनी महाग झाले. मुंबईत रेट 90.22 आणि दिल्लीत 82.86 रुपयांपर्यंत पोहोचले. तेल कंपन्यांनी लगातार सहाव्या दिवशी पेट्रोलचे रेट वाढवले. डिझेलच्या दरांमध्ये 10 ते 11 पैशांची वाढ झाली. सोमवारी ब्रेंट क्रूड 81 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचले. हे नोव्हेंबर 2014 नंतरचे सर्वात जास्त दर आहेत.

 

मेट्रो शहरांमधील रेट असे...

 

मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल

शहर सोमवारचे दर (प्रति लीटर) मंगळवारचे दर (प्रति लीटर) वाढ
दिल्ली 82.72 82.86 14 पैसे
मुंबई 90.08 90.22 14 पैसे
कोलकाता 84.54 84.68 14 पैसे
चेन्नई 85.99 86.13 14 पैसे

 

 

मेट्रो शहरांत डिझेल

शहर सोमवारचे दर (प्रति लीटर) मंगळवारचे दर (प्रति लीटर) वाढ
दिल्ली 74.02 74.12 10 पैसे
मुंबई 78.58 78.69 11 पैसे
कोलकाता 75.87 75.97 10 पैसे
चेन्नई 78.26 78.36 10 पैसे

 

 

डिसेंबरपर्यंत क्रूड 100 डॉलरपर्यंत पोहोचेल?
तज्ज्ञांच्या मते, इराणवर अमेरिकी प्रतिबंधामुळे या वर्षीच्या अखेरपर्यंत बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा रोज 20 लाख बॅरलने घटेल. यामुळे क्रूड 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

 

भारत आपल्या गरजेपैकी 81% कच्चे तेल आयात करतो. डॉलरच्या तुलनेत रुपयाही या वर्षी 13% हून जास्त कमजारे झाला. अशामध्ये तेल कंपन्यांसाठी इंपोर्ट महाग झाले आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...