आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुल फॅटच्या दुधामुळे कमी हाेताे मधुमेह, उष्माघात व हृदयाशी संबंधित अाजारांचा धाेका!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुल फॅट असलेले दूध अाराेग्यासाठी नुकसानकारक असते असा समज अाहे; परंतु अाता नवीन संशाेधनांनुसार अशा दुधामुळे अनेक फायदे हाेत असल्याचे समाेर अाले अाहे. फुल फॅट असलेले दूध प्यायल्याने मधुमेह, उष्माघात व हृदयाशी संबंधित अाजारांचा धाेका कमी हाेताे, असे जगभरातील अनेक नामांकित संशाेधनांतून सिद्ध झाले अाहे. कॅनडातील पाॅप्युलेशन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटचे पाेषण अाहारतज्ज्ञ महशिद देहगन यांनी अलीकडेच हा दावा केला अाहे. त्यांनी व त्यांच्या टीमने सप्टेंबर महिन्यातच 'लॅन्सेट' मासिकातील एका अभ्यासाचा हवाला देत म्हटले अाहे की, दिवसातून तीनदा फुल फॅटचे दूध वा दुग्धजन्य उत्पादने सेवन करणाऱ्यांना लवकर मृत्यू, हृदयाचे अाजार व उष्माघाताचा धाेका कमी हाेताे. तसेच एक वेळपेक्षा कमी या उत्पादनांचे सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत असे लाेक अधिक सुरक्षित असतात.


फुल फॅटच्या दुधात व्हिटॅमिन 'के', कॅल्शियम, मॅग्नेशियम व प्राेटीनसह अनेक पाैष्टिक घटक असतात. त्यामुळे पूर्वी अमेरिकी बाजारात दुधाची विक्री घटली हाेती; परंतु अाता चित्र बदलत अाहे. फॅट नसलेल्या दुधाची विक्री घटली असून गतवर्षी फॅटच्या दुधाची विक्री ५.३ अब्ज डाॅलर्स हाेती. 


ग्राहक अाता अधिक फॅट असलेल्या दुधाची मागणी करू लागले असल्याचे इंटरनॅशनल डेअरी फूड्स असाेसिएशनच्या (अायडीएफए) उपाध्यक्ष केरी फ्राय यांनी सांगितले. यासह एका इतर संशाेधनात सांगितले अाहे की, चरबी असलेले दुग्धजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांना हृदयाचे अाजार, टाइप-२ चा मधुमेह व स्थूलतेचा धाेका कमी असताे. कमी फॅट सेवन करणारे कमी कॅलरीची भरपाई खराब रिफाइंड कार्बाेहायड्रेट्सच्या माध्यमातून करतात, असेही नवीन संशाेधनातून समाेर अाले अाहे.

बातम्या आणखी आहेत...