आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Full Story Of Kashmir: After 2 Years Of Independence, Article 370 Was Made In 1949

काश्मीरची पूर्ण कथा : स्वातंत्र्यानंतर २ वर्षांनी १९४९ मध्ये कलम ३७० बनवले होते, आता ७० वर्षांनी निष्प्रभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1846 : जम्मू आणि लडाखचे शासक महाराजा गुलाबसिंहांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून काश्मीर खरेदी केले आणि जम्मू-काश्मीर राज्य स्थापले. हा करार अमृतसर करार या नावाने ओळखला जातो. 1931: महाराजा हरिसिंहांच्या विरोधात काश्मीरमध्ये आंदोलन. लष्कराने ते मोडून काढले.  1932 : काश्मिरी नेते शेख अब्दुल्लांनी हरिसिंहांकडून काश्मीर घेण्यासाठी लढाई सुरू केली. ऑल जम्मू अँड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्सची स्थापना केली.    1947: मार्चमध्ये काश्मीरच्या पूंछ भागात पुन्हा विरोधाचे सूर उमटले, पण महाराजांच्या लष्कराने ते दाबले.  

१९४६ मध्ये काश्मीरचे नेते शेख अब्दुल्लांनी ‘महाराज, काश्मीर सोडा’ हे आंदोलन सुरू केले. शेख यांना अटक झाली आणि त्यांना तीन वर्षांची शिक्षाही झाली होती.
 
1947: पाकसमर्थित आदिवासींनी काश्मीरवर हल्ला केला. दरम्यान, २६ ऑक्टोबर १९४७ ला महाराजा हरिसिंह यांनी भारतासोबत विलीनीकरण करारावर स्वाक्षरी केली. दरम्यान, गिलगिट-बाल्टिस्तान हातातून गेले.

1948 मध्ये भारताने काश्मीर मुद्दा यूएनमध्ये उपस्थित केला. १९५० मध्ये चीनने पश्चिम काश्मीरवर कब्जा केला. १९६२ मध्ये चीनने अक्साई चीनवरील युद्धात भारताला हरवले.

1965, 1971-72 मध्ये पाकने दोन हल्ले केले.दोन्हीत पराभव झाला. सिमला करारासह या युद्धाचा शेवट झाला.
 
पाक आदिवासींनी काश्मीरवर हल्ला केला. तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी काश्मिरी महिलांनी फौज तयार करून त्यांचा सामना केला होता.
 
1987 मध्ये निवडणूक घोटाळ्याचा आरोप करत पाकच्या इशाऱ्यावर काही नेत्यांनी शस्त्रे हाती घेतली. अशा प्रकारे दहशतवादाचा प्रारंभ.

1990: खोऱ्यात हिंदूंना वेचून मारले. यादरम्यान पाकिस्तानने दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन देशावर हल्ले केले.

1999: पाकचा कारगिलवर ताब्याचा प्रयत्न, त्यात हार मिळाली. २००१-२००४ मध्ये दिल्लीत संसद आणि जम्मू-काश्मीर विधानसभेवर हल्ला.

2014: पाक उच्चायुक्त फुटीरवादी नेत्यांना भेटले. भारताने चर्चा रद्द केली. यादरम्यान पीडीपी-भाजप सरकार स्थापन. 
 
गेल्या ३० वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या ७० हजारपेक्षा जास्त घटना, ४४ हजारपेक्षा जास्त मृत्यू, त्यात ५ हजारपेक्षा जास्त जवान शहीद झाले.