आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Full Time Women Finance Minister Nirmala Sitharaman Presented The Budget, Used A Folder To Break The Tradition Of Documents In Briefcase

हे प्रथमच : पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केले, ब्रीफकेसमध्ये कागदपत्रे आणण्याची परंपरा मोडत फोल्डरचा वापर केला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतात ४९ वर्षांनंतर महिलेने बजेट सादर केले. १९७० मध्ये इंदिरा गांधींनी बजेट सादर केले होते. इंदिरांकडे तेव्हा अर्थ मंत्रालयाचा प्रभार होता. निर्मला मात्र पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत.

 

फ्रेंच शब्दापासून ‘बजेट’ची उत्पत्ती

बजेट शब्द ‘बुगेट’ या फ्रेंच शब्दापासून तयार झाला. त्याचा अर्थ आहे चामड्याची पिशवी. बजेट ब्रीफकेसची परंपरा ब्रिटनमध्ये सुरू झाली.

 

चामड्याच्या बॅगचा वापर १९४७ पासूनच
देशाचे पहिले अर्थमंत्री आर. के. षण्मुगम शेट्टींनी चामड्याच्या बॅगमधूनच कागदपत्रे आणली होती. तेव्हापासून हीच परंपरा होती.

 

बजेट नाही, वहीखाते
आर्थिक सल्लागार के. सुब्रमणियन म्हणाले, हे पाश्चिमात्य मानसिकतेच्या गुलामीतून बाहेर येण्याचे प्रतीक आहे. हे बजेट नाही, वहीखाते आहे.

 

निधीचा उल्लेख नाही
कोणत्या मंत्रालयाअंतर्गत किती खर्च होईल हे सरकारने सांगितले नाही. हे प्रथमच झाले. नंतर आकडेवारी जारी करण्यात आली.

 

नारी तू नारायणी...
निर्मलांनी ‘नारी तू नारायणी’ घोषणा देत महिलांच्या आर्थिक विकासाच्या योजना सादर केल्या. जनधन खात्यात ५ हजारांच्या ओव्हरड्राफ्टची घोषणा.

 

बातम्या आणखी आहेत...