आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळ- शहरात एकाच वेळी पती-पत्नी आणि त्यांच्या नवजात जुळ्या बालकांची अंत्ययात्रा निघाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शहरातील साईनाथ नगरमध्ये मंगळवारी (ता. 26) दुपारी ही अंत्ययात्रा निघत असताना तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू येत होते. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे. मनोज (वय 37) आणि गायत्री असे या मृत दाम्पत्याचे नाव आहे. मनोज एका कार फायनान्स कंपनीत नोकरीला होता. 10 वर्षांपूर्वी मनोज आणि गायत्रीचा प्रेमविवाह झाला होता.
असा झाला चौघांचा मृत्यू
मनोज गेल्या काही दिवसांपासून न्युमोनियाने ग्रस्त होता. गायत्री गरोदर असल्याने त्याने तिला हॉस्पिटलमध्ये येण्यास मनाई केली होती. मनोज 12 नोव्हेंबरला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेला होता. ताप आणि खोकला असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला अॅडमिट करून घेतले होते. सोमवारी दुपारी जवळपास दीड वाजेच्या सुमारास मनोजचा भाऊ तरुण याने गायत्रीला फोन केला होता. तरुणने मनोजच्या प्रकृतीविषयी सांगून तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले होते.
40 फूट उंचीवरून घेतली गायत्रीने उडी
मनोजच्या प्रकृतीविषयी तरुणने सांगताच गायत्री अस्वस्थ झाली होती. अस्वस्थ झाल्याने तिने चौथ्या मजल्यावरुन 40 फूट उंचीवरून उडी घेतली. उडी घेतल्यानंतर ती इमारतीच्या एका बाल्कनीच्या ग्रिलवर आदळून भेट रस्त्यावर पडली. त्यानंतर तिच्या शेजारच्यांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये हलविले आणि उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
डोळे उघडताच जुळ्या बालकांनी घेतला जगाचा निरोप
नरेश म्हणाला, गायत्री सात महिन्यांची गरोदर होती. तिने आत्महत्या केल्यानंतर गायत्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. परंतु मुलांना जन्म देताच तिची प्राणज्योत मालवली. मात्र, तिच्या जुळ्या मुलांनीही जन्मानंतर अवघ्या 3 तासांत जगाचा निरोप घेतला..
चार तासांत उद्ध्वस्त झाले संपूर्ण कुटूंब..
- सोमवारी दुपारी 1:30 वाजता...गायत्रीने हॉस्पिटलमध्ये न जाता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली.
- सोमवारी दुपारी 2:00 वाजता...बेशुद्धावस्थेत गायत्रीने हॉस्पिटलमध्ये जुळ्या मुलांना जन्म देताच प्राण सोडला.
- सोमवारी सायंकाळी 5:00 वाजता...अवघ्या तीन तासांत नवजात बालकेही दगावली.
- सोमवारी सायंकाळी 6:00 वाजता... बन्सल हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या मनोजची प्राणज्योत मालवली.
पती-पत्नीवर एकाच वेळी केले अंत्यसंस्कार
जुळ्या नवजात बालकांना दफन केल्यानंतर मनोज-गायत्रीला शेजारी-शेजारी मुखाग्नी देण्यात आली. नरेशने सांगितले की, आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गायत्री माझ्या मुलीसारखी होती. त्यामुळे मी तिला मुखाग्नी दिली नाही. मनोजला त्याचा भाऊ तरुणने मुखाग्नी दिली. तर गायत्रीला तिच्या दिराने मुखाग्नी दिली.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.