आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बगदादमध्ये सुलेमानी यांना निरोप : इराकच्या पंतप्रधानांसह लाखो लोकांचा सहभाग, 'अमेरिका गो बॅक'च्या समर्थकांनी दिल्या घोषणा

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
छायाचित्र बगदादचे आहे - Divya Marathi
छायाचित्र बगदादचे आहे
 • इराण : सुलेमानी यांच्यावर मूळ गावी दफनविधी, अमेरिकेचा सूड घेण्यावरून निदर्शने
 • इराक : इराण समर्थनार्थ पीएमएफच्या दलावर अमेरिकेने ड्रोनने केला हल्ला, 6 जणांचा मृत्यू
 • जगात 20 हून जास्त देशांचा आपल्या नागरिकांना इराक व इराणला भेट न देण्याचा इशारा
 • अमेरिका आखातात 1.20 हजार जवान तैनात करणे शक्य

​​​​​​बगदाद : बगदादमध्ये शनिवारी इराणच्या रिव्होल्युश्नरी दलाचे कमांडर कासीम सुलेमानी व इराकी निमलष्करी दलाचे प्रमुख अबू महदी अल-महांदिस यांचा जनाजा काढण्यात आला. मुहांदित यांना बगदादमध्ये दफन करण्यात आले. सुलेमानी यांच्या पार्थिवाला इराणला नेण्यात आले. तेथे त्यांचे मूळ गाव आहे. याच गावात त्यांच्यावर दफनविधी होईल. तत्पूर्वी इराकची राजधानी बगदादमध्ये सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते. रस्त्यावर उतरलेल्या असंख्य लोकांच्या डोळ्यांतून अश्रू तरळत असतानाचे चित्र पाहायला मिळाले. लोक धायमोकलून रडत होते. 'अमेरिका मुरदाबाद', 'इस्रायल मुरदाबाद'च्या घोषणा दिल्या जात होत्या. समर्थकांच्या हाती 'अमेरिका गो बॅक'चे फलकही होते. इराकचे पंतप्रधान अदेल अब्देल महदी देखील अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. दुसरीकडे इराणमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही लाखो लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सुलेमानी यांचे स्मरण करत अमेरिकेचा सूड घेण्याची मागणी केली. इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी सुलेमानी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मध्य-पश्चिम आशियात वाढत्या तणावादरम्यान कतारने शांततेसाठी पुढाकार घेतला. कतारचे परराष्ट्र मंत्री तेहरानला पोहोचले. ब्रिटन, फ्रान्स, रशियासह २० पेक्षा जास्त देशांनी आपल्या नागरिकांना इराक-इराणला जाऊ नये, असा इशारा दिला आहे. इराणने संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून अमेरिकेवर कारवाईला दहशतवाद व बेकायदा असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रामधील इराणचे राजदूत म्हणाले, लष्करी कारवाईच्या विरोधात लष्करी कारवाईचीच प्रतिक्रिया असू शकतो. कोणाद्वारे ?, केव्हा ? व कोठे करायची? हे भविष्यातील गाेष्ट आहे. इराकमध्ये जल्लाेषही : काही इराकींनी सुलेमानींच्या मृत्यूवर बगदादच्या रस्त्यांवर जल्लाेष केला. काही महिन्यांपासून बगदादमध्ये लाेकशाही समर्थकांच्या शांततामय आंदाेलनांवर सुलेमानींच्या सांगण्यावरून सरकारद्वारे हिंसक कारवाई झाली हाेती.

अमेरिकेने दावा फेटाळला : सुलेमानींच्या हत्येच्या २४ तासांतच अमेरिकेने ड्राेन्सने उत्तर बगदादमध्ये शिया बंडखाेर संघटना पीएमएफच्या ताफ्यावर बाँब वर्षाव केला हाेता. या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या सैन्याने मात्र हा दावा फेटाळला.

अमेरिकेच्या जगभरात ८०० लष्करी छावण्या, आखाती देशांत १००, तैनात जवान ६०-७० हजारांवर

अमेरिका मध्य-पश्चिमेकडील (आखाती देश) क्षेत्रात ८२ व्या एअरबाेर्न ब्रिगेडच्या ३ हजारांहून जास्त सैनिकांना पाठवणार आहे. सध्या अमेरिकेचे इराकमध्ये ५२०० जवान तैनात आहेत. पेन्टागाॅनच्या म्हणण्यानुसार इराणसाेबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर १.२० लाख जवान आखाती देशात पाठवले जाऊ शकतात. अमेरिकेचे जगभरात ८०० लष्करी तळ आहेत. त्यापैकी १०० पेक्षा जास्त मध्य-पश्चिमेकडील देशांत आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्यानुसार ६० ते ७० हजार जवान मध्य-पश्चिम आशियात तैनात आहेत. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे १४ हजारांवर जवान तैनात आहेत. त्याशिवाय ८ हजार नाटाे सैनिकही सहभागी आहेत.

 • बहारीन : ७ हजार जवान तैनात, पैकी बहुतांश नौदलाचे आहेत. पर्शियन खाडीत शेख इसा हवाई दल व खलिफा इब्न सलमान पोर्टवर तैनात.
 • इराक : ५२०० जवान. ते इसिसच्या विरोधात तैनात केले होते
 • जॉर्डन : २७९५ अमेरिकी जवान इसिसच्या खात्म्यासाठी व क्षेत्रीय स्थैर्यासाठी तैनात करण्यात आले
 • कुवैत : १३०० हजार जवान येथे आहेत. अमेरिकी लष्कराचे मुख्यालय आहे. हे सैन्य तळ ब्यूहिंग, अली अल-सलेम हवाई दल, आरिफजन, कॅम्प पॅट्रियॉट व शेख अहमद अल-जाबिर तळावर तैनात.
 • आेमान : २०० हून जास्त सैनिक १९८० पासून तैनात. इसिसच्या विरोधात सल्ला व ड्यूक पाेर्टवर तैनात. कतार : १३००० हजार जवान. कतार दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी. हे जवान अल उदीद हवाई तळ, सायलीह तळावर तैनात.
 • सौदी अरब : गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला सौदीत ३ हजारांवर जवान पाठवले होते
 • सिरिया : अमेरिकेचे सेंट्रल कमांड सिरियातील विद्यमान सैन्य तैनातीचा तपशील सुरक्षेच्या कारणास्तवर जाहीर केलेला नाही. माध्यमांच्या मते २ हजार जवान अजूनही तेथे तैनात आहेत. ८०० तेल उत्पादकांच्या सुरक्षेत हे जवान तैनात.
 • तुर्की : येथील अमेरिकी सैनिकांची संख्या स्पष्ट नाही, येथे इजमिर, इनरलिक हवाईतळ. यूएई : पाच हजार जवान स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूझ जवळ तैनात. अल ढफरा हवाई तळ, पोर्ट ऑफ जेबेल अली व फुजैराह नौदल तळ
 • सूचना : या देशांव्यतिरिक्तही अमेरिकेचे अनेक लष्करी तळ आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची ठिकाणे जाहीर केली गेली नाहीत.

भारताला आखातात स्थैर्याबाबत आपली भूमिका दिसत नाही

इराणचे जनरल कासीम सुलेमानींचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यावर भारताने व्यक्त केलेली भूमिका धक्कादायक ठरली. हा अती मर्यादित आणि गुळगुळीत प्रतिसाद म्हणावा लागेल.

पश्चिम आशियातील शांतता व स्थैर्याच्या बाबतीत भारताला काेणतीही भूमिका निभवायची नाही, हेच या प्रतिक्रियेवरून स्पष्ट हाेते. नवी दिल्लीहून जारी झालेले वक्तव्य आपले राष्ट्रहित साधणारे नाही. आमच्यासाठी इराण व परिसरातील प्रदेश केवळ ऊर्जा सुरक्षा व आर्थिक हितसंबंधासाठी महत्त्वाचे नाही. कारण या क्षेत्रांत सुमारे ८० लाखांहून जास्त भारतीय लाेकसंख्या राहते. एखादे युद्ध झाल्यास एवढ्या माेठ्या लाेकसंख्येला त्याचा फटका बसू शकताे. भारताने या भागात शांतता व स्थैर्य नांदावे यासाठी राजकीय प्रयत्न केले पाहिजेत. युद्धाचे ढग दिसू लागले आहेत. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने इराण व त्यांच्या नेत्यांसाेबत शत्रूसारखे वर्तन केले. ट्रम्प यांच्या चाहत्यांना हे आवडू लागलेय. पश्चिम आशियातील युद्धाचे ढग त्यांचे हितसंबंध सुरक्षित करणारे ठरतात. लवकरच रशियाचे राष्ट्रपती पुतीन इराणचे राष्ट्रपती व इतर नेत्यांसाेबत चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतील. सुलेमानींचा मृत्यू ज्या प्रकारे झाला. त्यावरून गेल्या काही वर्षांत त्यांच्यात गर्व आला हाेता. त्यांच्यावर चित्रपट गीते िलहिली जात हाेती. म्हणूनच बगदादच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी ही गाणी एेकायला मिळाली.