आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांना अखेरचा निराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांच्या पार्थिवावर शुक्रवारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. भावना अनावर झाल्याने त्यांच्या चाहत्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. फुप्फुसाला जंतुसंसर्ग झाल्याने महाजन यांना मंगळवारी (२५ सप्टेंबर) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी (२७ सप्टेंबर) रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. 


अंतिम इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी सकाळी नऊच्या सुमारास महाजन यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्यासह अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

बातम्या आणखी आहेत...