आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी मतदान नंतर आईवर अंत्यसंस्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूर - श्यामसुंदर पेंटप्पा आडम (२२) विद्यार्थी संघटनेचे काम करताे. निवडणूक प्रचारातही ताे सक्रिय हाेता. परंतु मतदानाच्या दिवशी त्याच्या आईच्या छातीत वेदना सुरू झाल्या. दुपारी दाेनला रुग्णालयात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी बाहेर येऊन घरी घेऊन जाण्यास सांगितले. आई गेल्याचे दु:ख झेलत या तरुणाने पहिल्यांदा मतदान केले. त्यानंतर चितेला मुखाग्नी दिला. 

‘मतदान का केले नाही?’ याची अनेक कारणे सांगणाऱ्यांपुढे श्यामने नागरी कर्तव्याचे मूर्तिमंत अन् तितकेच करुण उदाहरण समाेर ठेवले आहे. श्यामची आई विडी कामगार. वय ५२ वर्षेच. साेमवारी त्यांच्या छातीत अचानक वेदना सुरू झाल्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डाॅक्टरांनी बरेच प्रयत्न करूनही त्या वाचू शकल्या नाहीत. डाॅक्टर आणि त्यांची टीम हताश हाेऊन बाहेर पडली. श्याम त्यांना सामाेरे गेला. डाॅक्टरांनी शांतपणे सांगितले, ‘बाळ, तुझी आई राहिली नाही.’ श्यामच्या वर जणू आभाळच काेसळले. आईचे पार्थिव घरी नेऊन त्याने दुपारी चारच्या सुमारास आधी मतदान केले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता पद्मशाली स्मशानभूमीत रचलेल्या चितेला अग्नी दिला.