आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजीराव नागवडे यांच्यावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष व माजी आमदार शिवाजीराव नारायणराव नागवडे यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी हजारोंच्या उपस्थितीत वांगदरी येथे साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ चिरंजीव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी त्यांना अग्नि दिला. यावेळी जिल्ह्यासह राज्यातील राजकीय, सामाजिक व अाध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 


तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे यांचे बुधवारी वयाच्या ८५ च्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गुरूवारी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नागवडे कारखान्यावर काही काळ ठेवण्यात आले होते. त्यानंतर मूळ गावी वांगदरी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, माजी उपमुख्यमंत्री व राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष खासदार विजयसिंह मोहिते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मधुकर पिचड, शंकरराव कोल्हे, दादापाटील शेळके, डी. एम. कांबळे, आमदार राहुल कुल, तालुक्याचे आमदार राहुल जगताप, आमदार स्नेहलता कोल्हे व सुरेश धस, सचिन जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, पांडुरंग अभंग, अशोक पवार, सुरेंद्र गांधी आदी उपस्थित होते. मान्यवरांसह असंख्य कार्यकर्त्यांनी बापूंना श्रद्धांजली अर्पण केली. 


कुकडी साखर कारखान्यातर्फे श्रद्धांजली 
कुकडी साखर कारखान्यावर शोकसभा घेऊन दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दहा महिन्यांपूर्वी कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव रामराव जगताप यांचे निधन झाले होते. एका वर्षात सहकारातील दोन दिग्गज नेते गेले. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे कुकडीचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव थोरात यांनी यावेळी सांगितले. कुकडीचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप, उपाध्यक्ष ललिता उगले, सर्व संचालक मंडळ, तसेच संचालक आबा पाटील पवार, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड, शेतकी अधिकारी सुभाष कुताळ, कामगार अध्यक्ष कल्याण पाटील यांनी श्रध्दांजली वाहिली. एक दिवसाचा दुखवटा पाळून कारखान्यास सुटी देण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...