आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवान सुनिल ढोपे यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारंजा (लाड)- शिलांग येथील बिएसएफ मध्ये कार्यरत होते ते जवान सुनिल यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याचे चिञ होते,फोनकाॅलच्या आधारावर घातपात झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियाकडुन करण्यात आला होता,मागन्या मान्य झाल्यानंतर पार्थीव स्विकारन्याची कुटुंबियांनी तयारी दर्शविल्यामुळे आता अंत्यसंस्काराचा मार्ग मोकळा झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील जवान सुनील ढोपे यांचं पार्थिव स्वीकारण्यास कुटुंब तयार झालं आहे. जिल्हा प्रशासन आणि ढोपे कुटुंबातील चर्चेनंतर हा निर्णय झाला. त्यामुळे उद्या कारंजा येथे सकाळी १० वाजता अमरावती येथून पार्थिव आणले जाईल. त्यानंतर संपूर्ण शहरातून शोभायात्रा काढून, जवान सुनील ढोपे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. 


यावेळी जिल्हा प्रशासनानी ढोपे कुटुंबांना लेखी पत्र दिले. त्यानुसार सर्व मागण्या लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल. ढोपे कुटुंबाच्या मागणीची प्रत सरकारकडे सुपूर्द केली जाईल. 


काय आहे संपूर्ण प्रकरण ? 
कारंजा येथील रहिवासी सुनील विठ्ठलराव ढोपे हे मेघालयतील शिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. १५ सप्टेंबर रोजी ते रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते. मात्र सुनील ढोपे यांचा मृत्यू नैसर्गिक नाही तर घातपात आहे, असा आरोप ढोपे कुटुंबीयांनी केला होता. तसेच त्यांना शहिदाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. 


ढोपे यांच्या मृत्यूची माहिती 15 सप्टेंबर रोजी बीएसएफ कॅम्पकडून ढोपे कुटुंबीयांना देण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांनी 16 सप्टेंबर रोजी अमरावतीतील कारंजा पोलीस स्टेशनला तक्रार देत चौकशीची मागणी केली. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले होते. 


दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी त्यांचे पार्थिव कारंजा येथे आणले होते. अंतिम दर्शनानंतर शासकीस इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. परंतु जोपर्यंत ढोपे यांना शहिदाचा दर्जा मिळणार नाही, तसेच त्यांच्या घातपात करणाऱ्यांना कठोर शासन होणार नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही, अशी ढोपे कुटुंबीयांनी भूमिका घेतल्याने त्यांचे शव अमरावती येथे नेण्यात आले. सुनील ढोपे हे १९ वर्षांपासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले वआणि भाऊ असा परिवार आहे. 


सुनील ढोपे यांचा मृत्यू नसून, हा घातपातच असल्याचा आरोप ढोपे कुटुंबीयांनी केला. सुनील ढोपे यांनी १४ सप्टेंबर रोजी फोन करुन आपण तणावात असून, वरिष्ठांसह सहकाऱ्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. या फोन रेकॉर्डिंगच्या आधारे सुनील यांचा भाऊ ज्ञानेश्वर ढोपे यांनी याप्रकरणी सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनला १६ सप्टेंबर रोजी तक्रार देत सविस्तर चौकशीची मागणी केली. 

बातम्या आणखी आहेत...