आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाह्नवी म्हणाली, मला बॉयफ्रेंड नाही; मग दादा अर्जुन कपूरने केली पोलखोल, पाहा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - श्रीदेवीची मुलगी जाह्नवी कपूरने नुकतेच आपला सावत्र भाऊ अर्जुन कपूरसोबत करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण' मध्ये सहभाग घेतला. यात भाऊ-बहिणींनी एकमेकांचे पाय ओढण्याची कुठलीही संधी सोडली नाही. या दरम्यान करणने देखील दोघांना असे प्रश्न विचारले की ते दोघेही हैराण झाले. त्यापैकीच एक प्रश्न होता, जाह्नवी तू इशान खट्टरला डेट करत आहेस का? त्यावर जाह्नवी लगेच मला बॉयफ्रेंड नाही असे उत्तर दिले. बाजूलाच बसलेला भाऊ अर्जुन कपूरने एक-एक करून आपल्या बहिणीची पोल-खोल सुरू केली. 


मग जाह्नवीने केली अर्जुनची बोलती बंद...
जाह्नवीने आपल्याला बॉयफ्रेंड नसल्याचे म्हणताच अर्जुने तिचे पाय ओढण्यास सुरुवात केली. तो वेळीच करणला म्हणाला ही खोटारडी आहे. "जाह्नवी नेहमीच इशानच्या आस-पास दिसून येते." भावाच्या चिडवण्यावरून जाह्नवीने पलटवार केला. "मग, तुझे कुणासोबत अफेअर सुरू आहे? सांग सांग..." यावर अर्जुन काहीच बोलला नाही. यानंतर जाह्नवीला करणने लव्ह हुक-अप्स संदर्भात विचारले. त्यावर मला काहीही माहिती नाही असे जाह्नवी म्हणाली. येथेही अर्जुन पुन्हा हसला. हे पाहा पू आता पार्वती बनली आहे. शो दरम्यान अर्जुनला करणने मलाइकासोबत अफेरच्या चर्चेवर थेट प्रश्न विचारला. परंतु, अर्जुनने अगदी चलाखीने तो प्रश्न टाळत वेळ मारून नेला.

बातम्या आणखी आहेत...