आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामना सुरू असताना मैदानावर फाटली या प्रसिद्ध क्रिकेटरची पँट; व्हायरल झाला व्हिडिओ...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंच्युरियन जेएनएन- सेंचुरियनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकीस्तान यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक गंमतीशीर प्रकार घडल्याने सर्व प्रेक्षकांत हास्याचा कळ्ळोल उठला. सेंचुरियनच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटर शॉन पोलाक यांच्यासोबत घडलेला प्रकार पाहून तुम्हीही तुमचे हसू आवरु शकणार नाही. तर झाले असे की, तिसऱ्या दिवशी लाइव्ह शो दरम्यान गोलंदाज शॉन पोलाक यांची पँट फाटल्याने त्यांना पायजमा घालावा लागला.

 

शॉन पोलाची फाटली पँट
सेंचुरियनमध्ये तिसऱ्या दिवशी सामना सुरू असताना शॉन पोलाक तज्ज्ञांची भुमिका पार पाडत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मैदानावर दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ग्रीम स्मिथ होते. त्यावेळी मैदानावर ग्रीम आणि शॉन चेंडू झेलण्याबद्दल चर्चा करत होते. त्याचवेळी मार्क निकोलसने  शॉनच्या दिशेने एक चेंडू फेकला आणि त्यांना तो झेलण्यास सांगितले. चेंडू जसा शॉनच्या दिशेने आला त्यांनी उडी घेऊन चेंडू झेलला. परंतू त्यात त्यांची पँट फाटली. ते पाहून ग्रीम आणि मार्क शॉनकडे पाहून हसू लागले.

 

त्यांच्यासोबत मैदानावरील उपस्थित असलेले प्रेक्षकही मोठ्याने हसू लागले. त्यामुळे शॉनला बाहेर निघण्यासाठी टॉवेलचा आसरा घ्यावा लागला. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर पोलाक यांनी फाटलेल्या पँटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांकडून शेअर केला जात आहे.

 

It's been all about split decisions at SuperSport park today 😂🏏 pic.twitter.com/v3SiCnInVQ

— SuperSport (@SuperSportTV) December 28, 2018

बातम्या आणखी आहेत...