आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉ मिलला लागलेल्या आगीत फर्निचर खाक, शॉर्टसर्कीटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमरावती - आरामशीनला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात फर्निचरचे साहित्य जळून खाक झाले. माहिती मिळताच अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळावर पोहोचत अग्नीशमन विभागाने तातडीने आग आटोक्यात आणली. त्यामुळे तब्बल एक काेटी रुपयांची संपत्ती वाचवली. 

स्थानिक हमालपुरा परिसरातील गांधी नगरातील नेहरू टिंबर मार्ट येथील प्रगती सॉ मिल या अारामशीनला दि. ९ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता अचानक आग लागली.

 

आरामशीनमध्ये लाकडाचे साहित्य तसेच फर्नीचर असल्याने क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. आगीची तीव्रता लक्षात घेेता रवींद्र सिंह सलुजा यांनी तातडीने अग्नीशमन विभागाला घटनेची माहिती दिली. अवघ्या दहा मिनिटांत म्हणजेच १०.४० वाजता मदतकार्य सुरू केले. अग्नीशमन विभागाने चार बंंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत फर्निचर, प्लायवूडचे साहित्य जळून खाक झाले.े अंदाजेे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

 

शॉर्टसर्कीटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वेळीच आग आटोक्यात अाणल्याने नेहरू टिंबर मार्केटमधील आरामशीन, लाकूड व फर्नीचरची दुकाने या आगीच्या भक्षस्थानी जाण्यापासून बचावली. अग्नीशनम जवानांच्या कामगिरीमुळे तब्बल एक कोटी रुपयांची संपत्तीचे नुकसान होण्यापासून वाचले. अग्नीशमन विभाग प्रमुख भारतसिंह चौव्हाण यांच्या नेतृत्वात सैय्यद अनवर, आणने, पंधरे, शेंडे, शोएब खान, इंगोले, चौखंडे, वरखडे, ददगाळ, सूर्यवंशी, चौधरी, हिवराळे आदी कर्मचाऱ्यांनी कामगिरी बजावली. 
 

बातम्या आणखी आहेत...