आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याच्या दरवाढीमुळे रोष; काँग्रेसची केजरीवाल सरकारच्या विरोधात निदर्शने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीत कांद्याचे दर ८० रुपये किलोवर पोहोचले असून त्यामुळे ग्राहकांची मोठी अडचण होत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कांदा दरवाढीच्या विरोधात केजरीवाल सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. कार्यकर्ते कांद्याच्या माळा घालून निदर्शनांत सहभागी झाले होते. निदर्शने करणारे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात चांगलीच चकमक उडाली. 
 

कांदा स्वस्त दरात देण्याचे ओडिशा सरकारचे निर्देश 
भुवनेश्वर - कांदा ना नफा-ना तोटा या तत्त्वावर ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश ओडिशा सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. स्थानिक बाजारातीन कांदा विकत घ्यावा आणि सरकारी केंद्रातून तो ग्राहकांना विकावास असे आदेश राज्याच्या नागरी पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. राज्यात सध्या विविध ठिकाणी कांदा ५२ ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे.
 

कांदा १०० रु. किलो; बाजारातून गायब : सेलजा
चंदीगड । राज्यात कांदा १०० रुपये प्रति किलो या दराने विकला जात असून अनेक ठिकाणी तो बाजारातून गायब झाला आहे, अशी टीका काँग्रेसच्या हरियाणाच्या प्रदेशाध्यक्ष कुमारी सेलजा यांनी केली. केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात हरियाणा प्रदेश काँग्रेसने पानिपत आणि फरिदाबाद जिल्ह्यांत निदर्शने केली. त्या वेळी त्या बोलत होत्या.