Home | Khabrein Jara Hat Ke | Fury of man as mum tries to split him and girlfriend up because she's his sister

6 वर्षांपासून ज्या मुलीला डेट करत होता मुलगा, आता त्यालाच वेगळे करतीये त्याची आई; कारण ती मुलगी त्याची बहीण असल्याचा आईने केला खुलासा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 24, 2019, 12:13 AM IST

आता काय करावे याबाबत मुलगा पडला संभ्रमात

 • Fury of man as mum tries to split him and girlfriend up because she's his sister


  खबर जरा हटके डेस्क : एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर स्वतःची वेगळीच समस्या शेअर केली आहे. त्याच्या आईलाच आपल्या मुलाचे प्रेयसीसोबत 6 वर्ष जुने असलेले रिलेशन ब्रेकअप करायचे आहे. कारण त्याची प्रेयसी ही त्याची बहिण असल्याचे आई त्याला सांगत आहे. मुलाच्या मते, आईने त्याच्या प्रेयसीच्या वडिलांसोबत लग्न केले आहे. यामुळे ती मुलगी त्याची सावत्र बहिण आहे आणि तेव्हापासून ही अडचण उद्धवली आहे. त्यामुळे आता काय करावे हे मुलाला समजत नाहीये.


  आईनेच प्रेयसीला बनवले मुलाची बहिण.....

  > मुलाने रेडिट या सोशल मीडिया साइटवर आपली व्यथा शेअर केली आहे. मुलाचे म्हणणे आहे की, 'मी आणि माझी प्रेयसी दोघांची वय 20 वर्षे आहे आणि आम्ही लहानपासूनच एकमेकांना ओळखतो. आम्ही वयाच्या 14व्या वर्षापासून एकमेकांना डेट करत आहोत.'

  - दोघेजण शालेय जीवनापासून सोबत आहेत आणि सोबतच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. मुलाच्या मते, आम्ही दोघं फक्त सोबत शिकतच नाही तर आमच्या पालकांनी एकमेकांसोबत लग्न केल्यापासून आम्ही दोघे एकाच घरात राहतो.

  > आम्ही हायस्कूलमध्ये शिकत असताना आमच्या पालकांचे अफेयर सुरु होते. तेव्हा आम्ही त्यांच्या डेट करण्यावर विरोध केला. कारण पुढे जाऊन काय समस्या होऊ शकते हे आम्हाला माहीत होते. पण त्यांनी ऐकले नाही.

  - आमचे पालक एकमेकांना डेट करत असताना त्यांना आमच्या नात्याबाबत कोणताच आक्षेप नव्हता. माझ्या आईला देखील काहीच अडचण नव्हती. पण गेल्या वर्षी त्यांनी लग्न केले आणि ते एकाच घरात शिफ्ट झाले. तेव्हापासून सर्वकाही बदलले आणि त्यांना आमच्या नात्यात खोट असल्याचे वाटू लागले.


  आईचे बोलणे काळजाला टोचते

  > मुलाचे म्हणणे आहे की, लग्नानंतर त्याची आई कोणत्या ना कोणत्या कारणाने मुलीला त्याची बहीण असल्याचे सांगत आहे. त्याची आई त्याला नेहमी म्हणते की, 'जा आपल्या आपल्या बहिणीला सांग.' मुलाच्या मते त्याची आई असे मुद्दामहून करत आहे.

  - मुलाला हा सर्व प्रकार खटकत आहे. आईचे बोलणे त्याला कानाला एखाद्या सुईप्रमाणे टोचत आहेत.

  - मुलगा आणि मुलगी दोघेही घरातून वेगळे राहण्यास तयार आहेत पण मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत आम्हाला घर सोडता येणार नाही. कारण आमच्याकडे उत्पन्नाचा कोणताच पर्याय नाहीये.

  - मुलाचे म्हणणे आहे की, माझे त्या मुलीवर प्रेम आहे. आम्ही बराच वेळ सोबत व्यतीत केला आले. मी माझे बाकीचे आयुष्य देखील तिच्यासोबत राहण्याची इच्छा आहे.

Trending