Maharashtra Specail / शिवसेनेची कोणतीही नाराजी नाहीये, आम्ही सोबत काम करू पण राज्याचा भावी मुख्यमंत्री भाजपचाच असेल- सुधीर मुनगंटीवार


"वर्धापन दिनाच्या निमित्ताने काका-पुतण्याचे एकमत व्हावे ही इच्छा"

दिव्य मराठी वेब

Jun 10,2019 07:54:00 PM IST

नाशिक- महाराष्ट्रात युती सरकारचे 41 खासदार आहेत, त्यामुळे राज्याचा भावी मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे सूचक वक्तव्य वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करण्याचे आदेश दिले, असेही मुनगंटीवार म्हणाले.


शिवसेनेच्या नाराजीवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, "शिवसेनेची कोणतीही नाराजी नाही. 'मिले सूर मेरा तुम्हारा, ये दोस्ती हम नही तोडेंगे', असे म्हणत आम्ही काम करू आणि करत आहोत. भाजपचाच मुख्यमंत्री होईल यात शंका नाही."


"वर्धापन दिनाच्या निमित्ताने काका-पुतण्याचे एकमत व्हावे ही इच्छा"
आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन आहे, त्यानिमीत्त काका-पुतण्याचे एकमत व्हावेत, असी इच्छा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. राष्ट्रवादीने आम्ही चुकलो तेव्हा वेळोवेळी अभ्यासपूर्ण टीका केली आहे. त्यांनी यापुढेही 25 वर्षे अशीच अभ्यासपूर्ण टीका करावी, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.

X
COMMENT