आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय मल्ल्यासारख्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी 9 कलमी कार्यक्रम, आर्थिक गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे समर्थनाचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्युनॉस एरेस - भारतीय बँकांतून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पोबारा करणारा विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चौकसी यांसारख्या आर्थिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या जी-२० देशांच्या परिषदेत जगभरातील नेत्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. आर्थिक गुन्हेगारांच्या विरोधात ९ कलमी कार्यक्रम त्यांनी सादर केला. 

 

आर्थिक गुन्हेगारांना आश्रय देण्यास प्रतिबंध करतानाच सदस्य देशांनी एक संयुक्त प्रयत्न, तंत्र आणि प्रक्रिया तयार करण्याची गरज आहे. अशा संयुक्त प्रयत्नांतून अनेक प्रकारचे गुन्हे उघडकीस येतील. त्या अंतर्गत गुन्हेगारांची आेळख पटवणे, त्यांचे प्रत्यार्पण करणे इत्यादी प्रक्रिया सहजपणे होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी मोदींनी उद््घाटनाच्या सत्रात अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली. प्रधानमंत्री जनधन योजना, मुद्रा, स्टार्ट अप इंडियासारख्या योजनांबद्दल त्यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करून सांगितले की, मोदींनी जी-२० परिषदेच्या पहिल्या सत्रात आपली भूमिका मांडली. दरम्यान, पंतप्रधान मोदी व संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिआे गुटेरस यांच्यातील चर्चेत पॅरिस करारास पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. आगामी परिषदेच्या तोंडावर त्यांनी ही भूमिका मांडली. 

 

जी-२० चे ८५ टक्के अर्थव्यवस्थेवर वर्चस्व 
जी-२० जगातील प्रमुख २० अर्थव्यवस्थांचा गट आहे. त्याचा जगातील ८५ टक्के अर्थव्यवस्थेवर प्रभाव व वर्चस्व आहे. परिषदेच्या सदस्यांत अमेरिका, चीन, अर्जेंटिना, जपान, रशिया, ब्रिटन, भारत, कोरिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, फ्रान्स,मेक्सिको, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युरोपीय संघांचा समावेश आहे. 

 

मोदींनी केलेल्या नऊ शिफारशी 
- पलायन केलेल्या आर्थिक गुन्हेगारांशी निपटण्यासाठी जी-२० देशांत परस्परांत सहकार्य करावे. 
- अशा गुन्हेगारांचे तातडीने प्रत्यार्पण व्हावे. सदस्य राष्ट्रांत सहकार्य हवे. 
- गुन्हेगारांनी इतर देशांत प्रवेश करू नये म्हणून कडक निर्बंध व व्यवस्था तयार व्हावी 
- भ्रष्टाचार विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्यासंबंधी संयुक्त राष्ट्राच्या नियमांची अंमलबजावणी व्हावी. 
- आर्थिक कृती कार्यक्रमांतर्गत गोपनीय संस्थेद्वारे (एफएटीएफ) समन्वय करणारी संस्था स्थापन करा. 
- एफएटीएफकडे पलायन करणाऱ्या गुन्हेगारांची परिभाषा निश्चित करण्याची जबाबदारी

सोपवावी.गुन्हेगारांची - आेळख, प्रत्यर्पण व कारवाईचे निकषांवर सहमती हवी 

- नियमांतील त्रुटी दुर करण्यासाठी संवाद व्यवस्था तयार करावी. 
- जी-२० संघटनेने गुन्हेगाराच्या संपत्तीचा शोध घ्यावा. त्यामुळे लवकर पैसा वसूल होऊ शकेल. 

 

सौदीचे राजकुमार माेहंमद सलमान रशियाच्या राष्ट्रपतींना जिवलग मित्रासारखे भेटले... 
खाशोगी यांच्या हत्येच्या दोन महिन्यांनंतर सौदीचे राजकुमार माेहंमद सलमान हे एखाद्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात पहिल्यांदाच सहभागी झाले होते. त्यांनी शनिवारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. अतिशय उत्साहाने त्यांनी पुतीन यांना हस्तांदोलन केले. तेव्हा दोन जिवलग अनेक वर्षांनी भेटल्यासारखे वाटले. 

 

पंतप्रधानांनी दिला नवा मंत्र : जपानचे 'जे', अमेरिकेचे 'ए' व इंडियाचे 'आय' मिळून बनले 'जय' अर्थात यशस्वी हाेऊ ! 
जी-२० परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग व रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पुतीन यांच्यात शनिवारी विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्य करण्यासंबंधी त्रिपक्षीय चर्चा झाली. तिन्ही नेत्यांमध्ये जागतिक शांतता, स्थैर्यासाठी योगदान देण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी भारत,जपान, अमेरिकेने परस्परांंमध्ये संवाद व समन्वय वाढवण्याचा निर्णय घेतला. तीन राष्ट्रप्रमुखांमधील बैठकीची ही १२ वर्षांतील दुसरीच वेळ ठरली. मोदी-अॅबे- ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. याप्रसंगी मोदी म्हणाले, संयुक्त मूल्यांसाठी भारत सोबत काम करण्यास तयार आहे. जपान, अमेरिका व भारताच्या आद्याक्षरांचा विचार करूया- जेएआय (जय), त्याचा अर्थ यशस्वी होणे, असा होताे. तीनही देशांनी त्यावर जरुर काम करावे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाची हिंदी-प्रशांत क्षेत्रातील बैठक त्यामुळे जास्त महत्त्वाची मानली जाते. 

 

ट्रम्प म्हणाले :सलमान यांच्याशी काही चर्चा नाही 
परिषदेदरम्यान सौदीचे राजकुमार मोहंमद बिन सलमान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्यांनी ट्रम्प यांनी मुलगी इव्हांका यांचीही भेट घेतली. मात्र, त्यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. तसे वाटले असते तर चर्चा करू शकलो असतो, असे ट्रम्प यांनीच स्पष्ट केले. 

 

'युरोपीय देश करतील खाशोगीप्रकरणी तपास' 
परिषदेदरम्यान फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन यांनी सौदीचे राजकुमार यांच्याशी पत्रकार खाशोगी हत्या प्रकरणी चर्चा केली. मॅक्रोन म्हणाले, युरोपीय देश या प्रकरणाचा तपास आंतरराष्ट्रीय चमूद्वारे करू इच्छितात. 

बातम्या आणखी आहेत...