आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरूंच्या भाषणाचे गडकरीही चाहते; म्हणाले, नेहरूंचे विचार मला अावडतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाचे अापणही चाहते असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले. 

दिल्लीत गुप्तचर खात्याच्या ३१ व्या व्याख्यानमालेत  गडकरी म्हणाले, ‘पंडित नेहरू नेहमी म्हणत की भारत हा देश नसून एक लाेकसंख्या अाहे. प्रत्येक व्यक्ती देशासाठी प्रश्न, समस्या अाहे. त्यांचे हे विचार मला अावडतात. एक मात्र नक्की सांगताे की मी कधीच देशासाठी समस्या बनणार नाही. प्रत्येक व्यक्तीने जर असा विचार केला तर अापला देश अापाेअापच सुधारेल. भलेही अापल्यावर अन्याय झाला तरी चालेल. मात्र अापण काेणावरही अन्याय करणार नाही असेही प्रत्येकाने ठरवायला हवे,’ असे अावाहनही त्यांनी केले.

 

‘खरे तर देशात समाज असताे अाणि समाजात अनेक व्यक्ती राहत असतात. व्यक्तींमध्ये सुधारणा झाली तरच समाजात व देशामध्ये सुधारणा हाेत असते. यंत्रणेत सुधारणा घडवायची असेल तर अापल्याला केवळ दुसऱ्याकडे बाेट दाखवून चालणार नाही. स्वत:कडेही पाहायला हवे,’ अशी अपेक्षाही गडकरींनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...