आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या खात्यात एक पैशाचाही भ्रष्टाचार होत नाही असे गडकरी म्हणताच वीज गेली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्यातील नवले पूल ते कात्रज या तीन किलोमीटर लांबीच्या महामार्ग सहापदरीकरण व सेवा रस्ते, पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांनी रिमोटची कळ दाबून केले. - Divya Marathi
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्यातील नवले पूल ते कात्रज या तीन किलोमीटर लांबीच्या महामार्ग सहापदरीकरण व सेवा रस्ते, पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांनी रिमोटची कळ दाबून केले.

पुणे : युती शासनाच्या काळात मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाचे प्रणेते केद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात मी १९९५ मध्ये राज्यात मंत्रिपदाच्या काळात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या विकासास चालना मिळाली. आमच्या खात्यात एक पैशाचा भ्रष्टाचार होत नाही, असे म्हणताच त्यांचे भाषण सुरू असताना अचानक वीज गुल झाली अन् ध्वनिक्षेपक बंद पडून गडकरींचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहाचणे कठीण झाले. त्यामुळे तांत्रिक बिघाड दूर करून ध्वनिक्षेपक यंत्रणा सुरू होईपर्यंत तीन मिनिटे गडकरींची बोलती बंद झाली. तंत्रज्ञांनी काही खटाटोप करून ध्वनिक्षेपक यंत्रणा सुरू केल्यावर गडकरी पुढे बोलू लागले. मात्र, एक पैशाचा भ्रटाचार होत नाही, असे म्हणताच वीज गेल्याची चर्चा जोरदार चर्चा सुरू झाली. या वेळी व्यासपीठावर आमदार शिवेंद्रराजे भोसले व आमदार भीमराव तापकिल उपस्थित होते.


पुण्यातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्यातील नवले पूल ते कात्रज या तीन किलोमीटर लांबीच्या महामार्ग सहापदरीकरण व सेवा रस्ते, पुलांच्या बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. रस्ते निर्मिती करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन रस्त्याला खड्डे पडतात अशी सर्वसामान्य लोकांची धारणा आहे, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...