23 दिवस मृत्यूशी / 23 दिवस मृत्यूशी झुंज..'त्या' अपघातात गंभीर जखमी झालेल्या गफ्फार पटेल यांचा मृत्यू

प्रतिनिधी

Feb 25,2019 03:28:00 PM IST

यावल- ट्रॅक्टर कलंडल्याने गंभीर जखमी झालेल्या गफ्फार हमदू पटेल (वय-50, रा.बोरावल गेट, यावल) यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. गफ्‍फार पटेल यांची मागील 23 दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती परंतु त्यात ते अपयशी ठरले. मृत्यूने त्यांच्यावर विजय मिळवला. सोमवारी (ता.25) गफ्फार पटेल यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

2 फेब्रुवारी रोजी शहरातील रहिवासी संजय भगवान भोई यांचे ट्रॅक्टर वाळू घेऊन शहरात येत होते. शहराबाहेरच असलेल्या खंडोबा मंदिराजवळ भरधाव ट्रॅक्टरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ते रस्त्याच्या कडेला कलंडले. ट्रॉली बसलेले गफ्फार हमदू पटेल हे ट्रॉलीखाली दाबले गेले. त्यांच्या उजव्या पायाच्या कमरे जवळील हाड मोडले गेले. तसेच छातीत गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळावरून त्यांना तात्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. पाय आणि छातीची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. नंतर त्यांची प्रकृती अधिक खालवल्याने त्यांना भुसावळात खासगी रूग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी सांयकाळी त्यांची प्राणज्योत मालावली.

मयत गफ्फार हमदू पटेल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलेे, दोन मुली असा परिवार आहे. संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणारे आहे. त्यातच घरातील कर्ता पुरुष गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भालशिव हे तापी नदीच्या काठी असलेले गाव आहे. या गावाजवळील तापी नदीतून अवैधपणे वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे ती शहरासह तालुक्यातील विविध भागात नेण्यात येते. अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे असंख्य ट्रॅक्टर या भागातून भरधाव येतात.

X
COMMENT