आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळवीर सुरक्षित राहावेत यासाठी ‘गगनयान मॉडेल’ची देशातील सर्वात मोठ्या-ऐतिहासिक ‘विंड टनेल’मध्ये चाचणी

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • बंगळुरूत ६१ वर्षे जुन्या हवाई बोगद्यातील चाचणीनंतर तयार होणार गगनयानचे मॉडेल
  • त्या वेळी १.४ लाख रुपयांत निर्मिती, शताब्दी रेल्वेच्या इंजिनचीही येथे चाचणी

बंगळुरू - गगनयानच्या प्रक्षेपणाची तारीख जवळ येत असल्याने याच्याशी संबंधित प्रत्येक घटकाला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. अंतराळात जाणारे हवाई दलाचे वैमानिक रशियात खडतर प्रशिक्षण घेत आहेत. ही मोहीम प्रत्यक्षात आणण्यासाठी गगनयानाच्या रचनेबाबत चाचण्या सुरू झाल्या आहेत. यासाठी बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेत ६१ वर्षांपूर्वी बनवलेल्या देशातील पहिल्या आणि एेतिहासिक हवाई बोगद्याची (विंड टनेल) निवड करण्यात आली आहे. या बोगद्यातील चाचणीत मॉडेल उत्तीर्ण झाले तर त्याआधारे मूळ नमुना (प्रोटोटाइप) तयार करण्यात येईल. अन्यथा त्यात बदल केले जातील. १९५९ मध्ये तयार करण्यात आलेल्या या ‘ओपन सर्किट विंड टनेल’मध्ये गगनयानच्या प्रारूपापासून ते त्यात वापरण्यात येणाऱ्या तंत्राचीही चाचणी शास्त्रज्ञ वेगवेगळ्या दाबाखाली ४५ अंशांतून फिरत करणार आहेत. यानाच्या प्रक्षेपणापासून ते शेवटच्या टप्प्यांपर्यंतच्या स्थितीची चाचणी होणार आहे. आयआयएससी एअरोडायमिक्सचे मुख्य संशोधन शास्त्रज्ञ व्ही. सुरेंद्रनाथ यांच्या मते, जास्तीत जास्त संरक्षित उपायांच्या दृष्टीने गगनयान मोहिमेच्या प्रत्येक टप्प्याची चाचणी होईल.  गगनयान ही मानव अंतराळात पाठवण्याची मोहीम २०२२ मध्ये प्रक्षेपित करण्याची इस्रोची योजना आहे. यात तीन अंतराळवीर असतील. यापूर्वी डिसेंबर २०२० आणि जुलै २०२१ मध्ये ह्युमनॉइड रोबो अंतराळात पाठवण्यात येईल. त्या वेळी १.४ लाख रुपयांत निर्मिती, शताब्दी रेल्वेच्या इंजिनचीही येथे चाचणी 


> देशातील अशा प्रकारचा पहिला बोगदा. १.४ लाख रुपयांत निर्मिती.
> बोगदा २० फूट रुंद आणि ८० फूट लांब आहे. त्याच्या एका टोकाला १६ मीटर व्यासाचे दोन मोठे पंखे आहेत, ते तासाला १६० किमी वेगाने हवा देतात. 
> बोगद्यात उच्च दाबाखाली मॉडेल किती टिकाऊ आहे याची चाचणी घेतली जाते. मॉडेल बोगद्याच्या मध्यभागी ठेवतात. 
> येथे सर्व प्रकारच्या विमानाचे मॉडेल, जहाजाचे मॉडेल, रेल्वे इंजिनचे मॉडेल, देशातील पहिल्या शताब्दी रेल्वेचे इंजिन, १९७० मध्ये दिल्ली महापालिकेच्या ३२ मजली इमारतीच्या मॉडेलची चाचणी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...